राम मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले माकड, पुढे असं काय घडलं की लोकं म्हणू लागले चमत्कार
Ram Mandir update : राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामलल्ला आता गर्भगृहात विराजमान झाले आहेत. राम मंदिरात आज एक माकड शिरला होता. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येथे माकड शिरले पण त्यानंतर जे घडलं ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
Ram mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारी रोजी भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक होता. कारण ५०० वर्षानंतर राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. या दिवशी देश-विदेशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्राणप्रतिष्ठेनंतर श्री राम मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक मंदिरात येत आहेत. अशा परिस्थितीत एक जबरदस्त घटना घडली आहे. जी सोशल मीडियावर शेअर होत आहे.
श्री रामजन्मभूमी मंदिरात एक अशी घटना घडली. ज्याला लोकं चमत्कार असल्याचं म्हणत आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, “आज संध्याकाळी 5:50 च्या सुमारास एक माकड दक्षिणेकडील दरवाजातून गर्भगृहात शिरले आणि उत्सव मूर्तीजवळ पोहोचले. बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी त्याच्या दिशेने धावले. पण माकड शांतपणे उत्तरेकडील दरवाजाकडे धावला. पण गेट बंद असल्याने ते पूर्वेकडे आले आणि भाविकांमधून कोणालाही त्रास न देता निघून गेला.
सुरक्षा कर्मचार्यांचे म्हणणे आहे की आमच्यासाठी जणू हनुमानजी स्वतः रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत. अशी ही घटना होती. राम मंदिराच्या सुरक्षेत तैनात असेलेल्या सुरक्षा जवानांनी सांगितले की, बाहेरून एक माकड आले आणि थेट गर्भगृहात घुसले. तो कुणाला तरी इचा करेल म्हणून आम्ही त्याच्या दिशेने धावलो. पण आश्चर्याची बाब म्हणजे या माकडाने कोणालाही इजा न करता थेट गर्भगृहातून बाहेर आले.
आज श्री रामजन्मभूमि मंदिर में हुई एक सुंदर घटना का वर्णन:
आज सायंकाल लगभग 5:50 बजे एक बंदर दक्षिणी द्वार से गूढ़ मंडप से होते हुए गर्भगृह में प्रवेश करके उत्सव मूर्ति के पास तक पहुंचा। बाहर तैनात सुरक्षाकर्मियों ने देखा, वे बन्दर की ओर यह सोच कर भागे कि कहीं यह बन्दर उत्सव…
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 23, 2024
प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात असे काही दिसले आहे, जे जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आजच्या काळात असे कसे होऊ शकते याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. हे पाहिल्यानंतर सर्वजण म्हणत आहेत की हनुमान स्वतः रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत.
अनेक भक्त या घटनेचा संबंध प्रभू रामाशी जोडत आहेत. हनुमान स्वतः भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी आले आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.