AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आकडा चंचल असतो, ह्या लोकांचं सरकार बनणार का हेही कुणी सांगू शकत नाही, संजय राऊत म्हणतात, खरी लढाई सभागृहात !

कालपर्यंत या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी परतावं, त्यांच्या मनात जो विचार आहे, काँग्रेस-राष्ट्रावादीसोबत कडीमोड घेण्याचा, त्या विचारावर चर्चा करु, मात्र २४ तासांत मुंबईत परत या, असं आवाहन करणारे संजय राऊत यांनी आता ही लढाई कायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे.

Sanjay Raut : आकडा चंचल असतो, ह्या लोकांचं सरकार बनणार का हेही कुणी सांगू शकत नाही, संजय राऊत म्हणतात, खरी लढाई सभागृहात !
Sanjay RautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:27 AM

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)गटाकडे ५० हून जास्त आमदार असतानाही महाविकास आघाडी सरकार (MVA government) टिकेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना आहे. काल रात्री दोन अपक्ष आमदारही शिवेसनेच्या गोटात सामील झाले असले तरी, आकडा चंचल असतो असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत, असे कुणी सांगतय, तर कुणी १४० आमदार आहेत, असे सांगत आहेत, मात्र हा आकडा चंचल असतो. खरी लढाई ही सभागृहात होईल आणि त्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आता ही लढाई कायदेशीर

कालपर्यंत या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी परतावं, त्यांच्या मनात जो विचार आहे, काँग्रेस-राष्ट्रावादीसोबत कडीमोड घेण्याचा, त्या विचारावर चर्चा करु, मात्र २४ तासांत मुंबईत परत या, असं आवाहन करणारे संजय राऊत यांनी आता ही लढाई कायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर आणि संजय राऊत यांनीही तुमच्या मनासारखं करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतरही शिंदे गट त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलेला दिसतो आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षातील फूट अटळ मानण्यात येते आहे. संजय राऊत यांनीही ही आता कायदेशीर लढाई आहे, असे सांगत, त्यावर एकाअर्थी शिक्कामोर्तबच केले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

शरद पवारांनाही बहुमताचा विश्वास

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर, शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हाच विश्वास व्यक्त केला होता. बहुमत हे विधानभवनात सिद्ध होते, त्यामुशे सदनात मविआचे बहुमत सिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले होते. शवसेनेच्या आमदारांनी केलेले बंड हे बेकायदेशीर असून, त्यांच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले होते. छगन भुजबळांच्या बंडाची आठवण करुन देत, या फुटलेल्या आमदारांपैकी अनेकांना पुढची निवडणूक जिंकून येणे अवघड असेल असेही पवार म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

पवारांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या 12 आमदार कारवाई करण्याची मागणी

शरद पवारांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 1. एकनाथ शिंदे 2. अब्दुल सत्तार 3. संदीपान भुमरे 4.  प्रकाश सुर्वे 5.  तानाजी सावंत 6.  महेश शिंदे 7.  अनिल बाबर 8.  यामिनी जाधव 9. संजय शिरसाट 10.  भरत गोगावले 11. बालाजी किणीकर 12.  लता सोनावणे

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.