Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boris Johnson India Tour Video: ब्रिटनचे पंतप्रधानही ‘बुलडोजर’च्या प्रेमात, गुजरात दौऱ्यात स्वत: स्टेअरींग केलं चेक

अहमदाबाद : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी सुरूवातीला त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला तसेच चरखा फिरवून सूतही कापले. त्याचवेळी, आता पंतप्रधान जॉन्सन गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी […]

Boris Johnson India Tour Video: ब्रिटनचे पंतप्रधानही 'बुलडोजर'च्या प्रेमात, गुजरात दौऱ्यात स्वत: स्टेअरींग केलं चेक
पंतप्रधान बोरिस जॉन्सनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 6:38 PM

अहमदाबाद : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी सुरूवातीला त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला तसेच चरखा फिरवून सूतही कापले. त्याचवेळी, आता पंतप्रधान जॉन्सन गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचे उद्घाटन करताना दिसले. तर या उद्घाटनानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. तर ते सरळ जाऊन जेसीबीच्या ड्रायव्हर सीटवर बसले. त्यांनी ते सुरू करून बघीतलं आणि परत दरवाजावर उभं राहत हात हलवले. त्यामुळे आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा आत्मविश्वास आणि आनंद यूजर्सना आवडला आहे.

विमानतळावर जंगी स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे गुरुवारी सकाळीच भारतात पोहोचले. अहमदाबाद विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. त्यांचे विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वागत केले. यावेळी अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

महात्मा गांधींचे दर्शन

यानंतर आपल्या दौऱ्याची सुरूवात करताना त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींचे दर्शन घेतले. तसेच फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर चरखा फिरवून सूतही कापले होता. यानंतर त्यांनी गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ही होते.

थेट पावले जेसीबीकडे

जेसीबीचे उद्धाटन केल्यानंतर पंतप्रधान बोरिस यांनी थेट पावले जेसीबीकडे वळवली आणि थेट ड्रायव्हर सीटचा ताबा घेतला. तसेच यानंतर त्यांनी त्याचा स्टाटर मारून तो सुरू करून बघीतला. यानंतर ते बाहेर येत दरवाजावर उभं राहत लोकांना अभिवादन केले. तसेच आपला हात उचलत आनंद व्यक्त केला. त्यामुळे आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा आत्मविश्वास आणि आनंद यूजर्सना आवडला आहे.

इतर बातम्या :

सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'.
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्...
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्....
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप.
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार.
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका.
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'.
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले.