ज्या मिसाईलने अभिनंदन वर्धमान यांनी पाकचे एफ-16 पाडले होते, ते आता भारतात तयार होणार
भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या मिग - 21 मधून मिसाईलद्वारे पाकचे F - 16 हे जेट फायटर पाडले होते. ज्या मिसाईलद्वारे ते पाडण्यात आल होते. ते मिसाईल आता भारतात तयार होणार आहे.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : साल 2019 रोजी पाकिस्तानी F-16 फायटर जेट सीमेवर उडताना दिसल्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर त्यांना हुसकविण्याची जबाबदारी सोपविली होती. भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या मिग-21 फायटर जेट मधून R -73 या हवेतून हवेत डागता येणाऱ्या मिसाईलने पाकिस्तानी फायटर जेट पाडले होते. आता हे R -73 मिसाईल सरकार देशातच तयार करणार आहे. सध्या या मिसाईलला रशियाची टॅक्टीकल मिसाईल कॉर्पोरेशन तयार करीत आहे.
भारतीय वायूसेनेच्या फायटर जेटसाठी R – 73 च्या लेटेस्ट व्हर्जनची गरज आहे. हे मुळचे रशियन मिसाईल असून त्याचे लेटेस्ट व्हर्जन R – 73 E देशात तयार होणार आहे. आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत मेक – 3 प्रोजेक्ट अंतर्गत हे मिसाईल देशातच तयार केले जाणार आहे. मिसाईलचे हे लेटेस्ट व्हर्जनची रेंज 30 किलोमीटर आहे. या मिसाईलमध्ये RVV-MD टेक्नॉलॉजीचा वापक केला आहे. ज्याच्या मदतीने त्याचा पल्ला वाढवून 40 किलोमीटर करण्यात येणार आहे. हे मिसाईल डॉग फायटरसाठी तयार केले आहे. दिवस असो वा रात्र कोणत्याही हवाई टार्गेटला कोणत्याही दिशेने हे मिसाईल लक्ष्य करु शकते. या मिसाईलला फायटर जेट्स, बॉम्बवर्षक किंवा अटॅक हेलिकॉप्टरवर देखील लावाता येऊ शकते.
30 किलोमीटर उंचीपर्यंत उडते
या मिसाईलला कम्बाईन्ड गॅस एअरोडायनामिक कंट्रोल सिस्टीम लावली आहे. हे मिसाईल सरळ रेषेत जाताना टार्गेटप्रमाणे दिशा देखील बदलू शकते. त्याचा वेग 2500 किमी प्रति तास इतका आहे. ते 2 मीटर ते 20 किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकते. तर किमान 30 किलोमीटर उंचीपर्यंत ते जाऊ शकते.
विंग कमांडर सुरक्षित आले परत
विंग कमांडर अभिनंदन याचे मिसाईलने पाकिस्तानी F – 16 फायटर पाडले होते. यानंतर त्यांच्या मिग-21 फायटर जेटवर हल्ला झाल्याने अभिनंदन इजेक्ट करुन विमानातून पॅराशूटने पाकच्या हद्दीत पडले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षित भारतात आणण्यात आले. या मिसाईलच्या ताकद पाहून आता तिला भारतातच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.