साडेतीन फूट उंच इमरानचा पत्नीचा शोध पूर्ण; या मुलीसोबत विवाह

इमरानच्या आईला तीन फूट उंच असणाऱ्या पटवारी नगला येथील खुशबूबद्दल माहीत झालं. तिने मुलासाठी मुलीच्या पालकांशी संपर्क केला. दोघांचेही उंचीबरोबरच विचार जुळले.

साडेतीन फूट उंच इमरानचा पत्नीचा शोध पूर्ण; या मुलीसोबत विवाह
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 3:20 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एका नवरदेव-नवरीची जोडी चर्चेचा विषय झाली. अलीगडच्या जीवनगडमधील गल्ली नंबर ८ मध्ये राहणारा इमरान लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. कारण त्याची उंची फक्त साडेतीन फूट होती. त्यामुळं त्याला मुली मिळणे कठीण झालं होतं. दरम्यान, त्याची ओळख खुशबूसोबत झाली. सात भावाबहिणींमध्ये सर्वात लहान इमरान. उंची साडेतीन फूट असल्यामुळं त्याला कुणी लग्नासाठी मुली देईना. नवरीच्या शोधासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. आता इमरानला त्याची जीवनसाथी मिळाली आहे.

अलीगडमधील इमरानची इंची ३ फूट ४ इंच आहे. उंची कमी असल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. सर्व भावा बहिणींची लग्न झाली.पण, इमरानला काही मुलगी लग्नासाठी मिळाली नव्हती. त्यामुळं तो निराश झाला होता.

इमरानची आईला मदत

दोधपूर येथील एका हॉटेलमध्ये काम करून तो आईसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी इमरानने आपली आई बिरजीस यांच्या डोळ्याची शस्त्रक्रियाही करवून घेतली. असं म्हटलं जात की चांगलं काम करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते. असंच काही इमरानसोबत झालं.

उंचीबरोबर विचारही जुळले

इमरानच्या आईला तीन फूट उंच असणाऱ्या पटवारी नगला येथील खुशबूबद्दल माहीत झालं. तिने मुलासाठी मुलीच्या पालकांशी संपर्क केला. दोघांचेही उंचीबरोबरच विचार जुळले. लग्नासाठी तयारी केली.

दोन्ही कुटुंबीय आनंदी

इमरानचं लग्न रविवारी पटवारी नगला येथील रहिवासी खुशबूसोबत झालं. लग्नानंतर दोन्ही कुटुंबातील नातेवाईक खूश आहेत. शेजारी राहणारा आमीर रशीद म्हणाले, उपरवाला जोड्या बनवून पाठवितो. याचं उदाहरण म्हणजे इमरान आणि खुशबू आहेत. या विवाहामुळं इमरान आणि खुशबू आनंदी आहेत.

उंची कमी असल्याने मिळत नव्हत्या मुली

माझं लग्न होणार की नाही, या विचारात इमरान होता. मला माझ्या उंचीशी समरूम मुलगी कशी मिळेल, याचा शोध तो घेत होता. पण, योग्य जोडी मिळत नव्हती. तो कमी उंचीचा असल्याने लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. पण, खुशबूबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांचे विचारही जुळले. अखेर लग्न पार पडलं. आता दोन्ही कुटुंबीय खूश आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.