AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electricity Shock: पेट्रोल, डिझेल झालं आता वीज दरवाढीचा झटका; थकबाकीमुळे वीज दरवाढ लादली जाणार; 13 राज्यांना बसणार फटका

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आजपासून नवीन नियम जारी केले असून थकबाकी 7 महिन्यात भरण्याची मुदत असून पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडच्या निर्णयाचा फटका 13 राज्यांना बसणार आहे.

Electricity Shock: पेट्रोल, डिझेल झालं आता वीज दरवाढीचा झटका; थकबाकीमुळे वीज दरवाढ लादली जाणार; 13 राज्यांना बसणार फटका
| Updated on: Aug 20, 2022 | 6:55 AM
Share

नवी दिल्ली: भारतात सध्या सर्वच क्षेत्रात महागाईने डोके वर काढले आहे, प्रत्येक गोष्टीसाठी अव्वाच्या सव्वा रुपये खर्च लागत असून एकूण भारतातीलच प्रत्येक नागरिक महागाईने त्रस्त आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या वाढत्या दराने (Electricity price hike) वाहनधारकांना मेटाकुटीला आणले असतानाच आता वीज दरवाढीमुळे नागरिकांना पुन्हा एकदा विजेचा मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल घरगुती वापराचा गॅस, अन्नधान्य सह सर्वच जीवनावश्यक बाबी महागल्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला आता ऐन सणासुदीच्या दिवसात वीज दरवाढीचा पुन्हा शॉक बसणार आहे. पॉवर सिस्टिम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे (POWER SYSTEM OPERATION COOPERATION LIMITED) बिल महाराष्ट्रसह 13 राज्यानी थकवले (Exhausted by 13 states) आहे. हे थकबाकी भरण्यासाठी जनतेवर वीज दरवाढ लादली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. उन्हाळा आणि गणपती दसरा दिवाळी या मोठ्या सणासुदींच्या काळात विजेची मागणी वाढत असल्याने तेव्हा राज्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागतो.

त्यावेळी इतर राज्यांच्या वीज प्रकल्पामधून वीज घेता येते मात्र या पॉवर अॅक्शनसाठी पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडची परवानगी लागते. त्यासाठी वीज बिल राज्यांना द्यावे लागते परंतु 13 राज्यानी पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे 5000 कोटी रुपये थकवले आहेत.

पॉवर एक्सचेंज करण्यास नकार

ही बाकी भरल्याशिवाय पॉवर एक्सचेंज करण्यास नकार देण्यात आला आहे, त्यामुळे आता 13 राज्यातील वीज कंपन्यांना पॉवर एक्सचेंज करता येणार नाही. थकबाकीचे ओझे ग्राहकावर टाकले जाणार असून पर्यायाने वीज बिल महागण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रासह 13 राज्यातील जनतेला फटका

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आजपासून नवीन नियम जारी केले असून थकबाकी 7 महिन्यात भरण्याची मुदत असून पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडच्या निर्णयाचा फटका 13 राज्यांना बसणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मणीपूर, मिझोराम आणि जम्मू-काश्मीरमधील वीज कंपन्यांना थकबाकी भरल्याशिवाय आता पॉवर एक्सेंजमधून वीज खरेदी करता येणार नाही.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.