Salman Khan: ज्या हरणाची शिकार झाली त्याचा पुतळा तयार, 800 किलो लोखंड आणि सिमेंटचा वापर, शिंगं मात्र खरी
त्याच चिंकाराच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक तयार करण्यात येते आहे. ज्या ठिकाणी कांकाणीत या हरणाला दफन करण्यात आले, त्याच ठिकाणी हे स्मारक बांधण्यात येते आहे. सात बिघा जमिनीवर विशाल स्मारक उभारण्यात येते आहे. एखाद्या संत महात्म्याप्रमाणे ही हरणाची समाधी असणार आहे. त्याचबरोबर या परिसरात वन्यजीवांच्या विशेष करुन हरणांच्या सुटकेसाठी रेस्क्यू सेंटरही तयार करण्यात येणार आहे.

जोधपूर – सलमान खान (Salman Khan)याने ज्या काळ्या हरणाची (black deer) शिकार केली होती, त्या हरणाचे भव्य स्मारक जोधपूरमध्ये उभे राहत आहे. कांकाणी गावात उभे राहत असलेल्या या स्मारकासाठी काळ्या हरणाचा पुतळा (statue of deer) तयार झालेला आहे. वन्यजीव आणि पर्यावरणाबाबत जनतेत जागृती निर्माण व्हावी, यासाठी हे स्मारक उभारण्यात येते आहे. चिंकाराचे हा पुतळा सिमेंट आणि लोखंडाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन सुमारे 800 किलोच्या जवळपास आहे. जोधपुरातील सिवांची गेट येथील रहिवासी मूर्तीकार शंकर यांनी हा पुतळा अवघ्या 15 दिवसांत तयार केला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घेऊयात.
हम साथ साथ हैच्या शूटिंगच्या वेळी करण्यात आली होती शिकार
हे प्रकरण 1998 सालचे आहे. जोधपूरच्या जवळपास हम साथ साथ है, या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. त्यावेळी सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम व इतरांनी भवाद आणि कांकाणी गावात काळ्या हरणाची शिकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सलामन खान खान याला गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणात जोधपूर कोर्टात खेटे मारावे लागले. अखेरीस त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. सलमान सोडून या प्रकरणातील इतरांना जामीन मिळालेला आहे.
कांकाणीत हरणाचे स्मारक
आता त्याच चिंकाराच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक तयार करण्यात येते आहे. ज्या ठिकाणी कांकाणीत या हरणाला दफन करण्यात आले, त्याच ठिकाणी हे स्मारक बांधण्यात येते आहे. सात बिघा जमिनीवर विशाल स्मारक उभारण्यात येते आहे. एखाद्या संत महात्म्याप्रमाणे ही हरणाची समाधी असणार आहे. त्याचबरोबर या परिसरात वन्यजीवांच्या विशेष करुन हरणांच्या सुटकेसाठी रेस्क्यू सेंटरही तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी जखमी झालेल्या हरणांवर उपचार करण्यात येणार आहे, तसेच त्यांची देखभालही ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन कोणत्याही नेत्याच्या हस्ते व्हावे, अशी ग्रामस्थांची इच्छा नाही.



बिश्नोई समाजाने दिली स्मारकासाठी जमीन दान
हरीण शिकार प्रकरणात बिश्नोई समाजाने मोठा लढा दिला आहे. समाजाने या स्मारकासाठी जमीनही दिली आहे. या हरणाच्या समाधासाठी समाजातील 200 जण पुढे आले होते. कांकाणी युवा नावाने एक ग्रुप स्थापन करण्यात आला. यात एकही लोकप्रितनिधी नव्हता. जोजरी नदीच्या किनारी 7 बिघा जमीन गावाचे कुरण होते. याच परिसरात सलमान खानने शिकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याच ठिकाणी हरणाचे दफन करण्यात आले. तिथेच आता हे भव्य स्मारक उभारण्यात येते आहे. बिश्नोई समाजात काळ्या हरणाबाबत प्रचंड श्रद्धा आहे.
हे ही वाचा