कारसारखा आराम तरी बाईकची मजा, जगातील पहिली सेल्फ बॅलेंसिंग ई-स्कूटर
या ऑटो एक्स्पोमध्ये काही कार आणि बाईकचे भन्नाट मॉडेल्सही पाहायला मिळत आहेत. जे संपूर्णपणे वेगळे आहेत. यातील सर्वात अनोखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Liger X आणि Liger X Plus ने सेल्फ बॅलन्सिंग ई-स्कूटर्स सादर केली आहे.
दिल्ली : भारतात सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो ( AutoExpo2023) मध्ये, देशी आणि परदेशातील अनेक कंपन्यांनी त्यांची वाहने सादर केली आहेत. प्री-प्रॉडक्शन मॉडेल्सपासून ते प्रोडक्शन रेडी मॉडेल्सपर्यंत वाहने यावेळी दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात बाजारात कोणत्या गाड्या येतील ते स्पष्टपणे समजू शकते. ऑटो एक्स्पो संपल्यानंतर काही महिन्यांनी या कंपन्या त्यांच्या काही कार आणि बाइक्स लाँच करतील. अशा परिस्थितीत हा ऑटो एक्स्पो कार-बाईकप्रेमींसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या ऑटो एक्स्पोमध्ये काही कार आणि बाईकचे भन्नाट मॉडेल्सही पाहायला मिळत आहेत. जे संपूर्णपणे वेगळे आहेत. यातील सर्वात अनोखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Liger X आणि Liger X Plus ने सेल्फ बॅलन्सिंग ई-स्कूटर्स सादर केली आहे. ही जगातील पहिली सेल्फ-बॅलेंसिंग ई-स्कूटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
वास्तविक कोणत्याही प्रकारची स्कूटर स्टँडशिवाय स्वत: जागेवर उभी राहू शकत नाही, तिला आधार द्यावाच लागतो. परंतू या नव्या प्रकारच्या स्कूटर आरामात जागेवर उभ्या राहू शकतात. त्यामुळे सिग्नलवर गाडी थांबवताना पाय खाली घेण्याची गरजच राहणार नाही.लिगर मोबिलिटी (Liger Mobility) ने जगातील पहीली सेल्फ बॅलेंसिंग ई-स्कूटर ऑटो एक्सपोमध्ये सादर केली आहे.
अर्थात या नव्या ई-स्कूटर बद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. लिगर एक्स मध्ये रिमुव्हेबल किंवा डीटॅचेबल बॅटरी मिळणार आहे. जिला चार्ज करण्यासाठी तीन तासांपेक्षा कमी वेळ लागेल. तर लिगर एक्स प्लस मध्ये नॉन डीटॅचबल बॅटरी दिली असून तिला चार्ज करण्यासाठी 4.5 तासांचा वेळ लागणार आहे. अन्य स्कूटर प्रमाणेच यात रिव्हर्सिंग बटन, लर्नर मोड और ओटीए (ओवर-द-एयर) सॉफ्टवेयर अपडेट सारखे फीचर्स मिळणार आहेत. या दोन्ही स्कूटर 4G आणि GPS ला सपोर्ट करतात. लिगर एक्स प्लस मध्ये टर्न-बाय-टर्न नेविगेशनची सुविधा आहे. यंदा दिवाळीपर्यंत ही स्कूटर भारतात लॉन्च होऊ शकते. कंपनी त्यांना 90,000 रुपये एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करू शकते. लिगर एक्स मॉडल 65 किलोमीटर प्रति तासांचा वेगात धावेल तर लिगर एक्स प्लस मॉडलला 100 किलोमीटरची रेंज असणार आहे.