CM Yogi : उन्माद पसरवणार्‍यांवर कारवाई होणारच; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तंबी

लखनऊ : देशाची राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या (Violence) झळा अख्या देशाला भसत आहेत. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti)दिवशी शोभायात्रेच्या मिरवणुकीत गोंधळ झाला. आणि दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधण्यात आला. त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारित झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर विटा आणि दगडांचा मारा केला. यात पोलिसही जखमी […]

CM Yogi : उन्माद पसरवणार्‍यांवर कारवाई होणारच; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तंबी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:01 PM

लखनऊ : देशाची राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या (Violence) झळा अख्या देशाला भसत आहेत. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti)दिवशी शोभायात्रेच्या मिरवणुकीत गोंधळ झाला. आणि दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधण्यात आला. त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारित झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर विटा आणि दगडांचा मारा केला. यात पोलिसही जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 20 पेक्षाही अधीक जनांना ताब्यात घेतलं आहे. यादरम्यान महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी हनुमान चालिसा आणि भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. येथे राजकारण तापलं असताना आता भोंग्याचा मुद्दा यूपीपर्यंत पोहोचला आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी सांगितलं असून परवानगीशिवाय मिरवणूक काढू नका, माईक वापरा पण आवाज परिसराबाहेर जाऊ नये असा आदेश काढला आहे. त्यामुळे आता त्यामुळे आता किमान देशात सुरू असणारे भोंग्याचे राजकारण उत्तर प्रदेशमध्ये तरी शमेल असे वाटतं आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भूमिका स्पष्ट

तसेच मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या पहिल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. उन्माद पसरवणार्‍या आणि अफवा पसरवणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. मग ती बाजू कुठलीही असो. परवानगीशिवाय मिरवणूक किंवा धार्मिक मिरवणूक काढू नये. परवानगी देखील फक्त पारंपारिक असलेल्यांनाच द्यावी. कोणतीही नवीन परंपरा सुरू होऊ देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. नवीन कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

ट्विटरवरून ट्विट

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले आहे की, ‘परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक/धार्मिक मिरवणूक काढू नये. परवानगीपूर्वी आयोजकांकडून शांतता आणि सलोखा राखण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेतले पाहिजे. ज्या धार्मिक मिरवणुका पारंपारिक आहेत, नवीन कार्यक्रमांनाच परवानगी देण्यात यावी.

रामनवमी-हनुमान जयंतीला हिंसाचाराच्या घटना

दरम्यान, योगी सरकारचा हा आदेश अशा वेळी आला आहे. जेव्हा नुकत्याच रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. याशिवाय दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीला हिंसाचार झाला होता.

इतर बातम्या :

Jahangirpuri Violence : हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप; जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आणखी 5 CRPF कंपन्या दिल्लीला रवाना

jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार: दंगलखोरांनी दुकानांची तोडफोड केली, पुरावे नष्ट करण्यासाठी CCTV वायर तोडली

Delhi Hanuman jayanti violence : मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत, घोषणाबाजी आणि नमाजची वेळ… असं काय घडलं?

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.