Chandrayaan-3 update : चंद्रावर स्वारी…चंद्रयान-3 च्या यशात या कंपन्यांनी केली महत्वाची मदत

चंद्रयान-3 ने सुखरुपपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग केले आहे. या यानाच्या उभारणीत अनेक भारतीय कंपन्याचे योगदान आहे.

Chandrayaan-3 update : चंद्रावर स्वारी...चंद्रयान-3 च्या यशात या कंपन्यांनी केली महत्वाची मदत
chandrayaan 3 Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 7:57 PM

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग करुन इतिहास रचला आहे. 14 जुलै 2023 रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून रॉकेटद्वारे रवाना झालेल्या चंद्रयान-3 अखेर आज सायंकाळी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करुन भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. चंद्रयान-3 च्या या यशाला भारतीय कंपन्यांनी केलेली मदतही बहुमोल ठरली आहे.

MTAR टेक्नॉलॉजिस –

चंद्रयान-3 साठी या खाजगी कंपनीने इंजिन आणि बुस्टर पंप्स सह अनेक कंपोनेंट तयार केले आहेत. याशिवाय अंकीत एअरोस्पेस कंपनी अलॉय स्टील, स्टेनलेस स्टील फास्टनर्स आणि तसेच विशेष टायटेनियम बोल्टस तयार केले. तर बूस्टर सेगमेंट S200 ला Walchandnagar industries ने तयार केले आहेत.

मिश्र धातू निगम –

मिश्र धातू निगम लिमिटेडने इस्रोच्या चंद्रयान-3 साठी अनेक महत्वाचे मटेरियल पुरविले आहेत. यात कोबाल्ड बेस एलॉयल, नकेल बेस एलॉयज, टायटेनियम एलॉयज आणि स्पेशल स्टील्सचा समावेश आहे. याच मटेरियलचा वापर लॉंच व्हेईकल तयार करण्यासाठी केला आहे.

अनंत टेनॉलॉजिस –

या चंद्रमोहीमेसाठी अनंत टेक्नॉलॉजीस लि. (ATL) इस्रोचे लॉंच व्हीईकल, सॅटेलाईट, अंतराळ यान पेलोड आणि ग्राऊंड सिस्टमसाठी विविध इलेक्ट्रॉनिक्स सह अनेक उपकरणे तयार केली.

गोदरेज एअरोस्पेस –

गोदरेज इंडस्ट्रीजची स्पेश सेक्टरमधील कंपनी गोदरेज एअरोस्पेस चंद्रयान-3 साठी विकास इंजिन, CE20 आणि सॅटेलाईट थ्रस्टर गोदरेजच्या विक्रोळीतील फॅसिलीटी सेंटरमध्ये तयार झाले आहेत. तसेच कोर स्टेजसाठी L110 इंजिनाला गोदरेजने तयार केले आहे.

भेल (BHEL ) –

चंद्रयानची बॅटरी सप्लाय भेल कंपनीने तयार केली आहे. चंद्रयानसाठी बाय-मॅटलिक एडॉप्टर देखील उपलब्ध केला आहे. या सरकार कंपनीचे शेअर पाच दिवसात चांगले तेजीत होते. परंतू बुधवारी त्यात घसरणही झाली होती.

टाटा स्टील –

टाटा ग्रुपने देखील चंद्रयान-3 च्या लॉंचिंग मध्ये महत्वाची जबाबदारी निभावली आहे. टाटा स्टीलच्या क्रेनमुळे आंध्रातील सतीश धवन अंतराळ केंद्रात लॉंच वाहन LVM3 M4 ( FAT BOY ) असेंबल करायला मदत केली. टाटाचे स्टील शेअर 1.11 टक्के वाढून 118.85 रुपयावर बंद झाले.

लार्सन एण्ड टुब्रो लिमिटेड –

लार्सन एंड टूब्रो की एयरोस्पेस यूनिटने चंद्रयान-3 मिशनच्या लॉंच व्हेईकलचे आवश्यक पार्टचा पुरवठा केला आहे. यानाचा बुस्टर सेगमेंट या कंपनीने तयार केला. यात हेड एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि नोजल बकेटफ्लेजचा समावेश आहे. चंद्रयान मोहिमेच्या लॅंडींग या कंपन्यांचे शेअरमध्ये तेजी आली होती.

हिंदुस्थान एअरोनॉटीक्स –

हिंदुस्थान एअरोनॉटीक्स ( HAL) नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीजला अनेक महत्वाचे साहित्य पुरवठा करण्यात आले आहे. बुधवारी शेअरबाजारात कंपनीचे शेअर तेजीत होते. दिवसाचे कामकाज संपतात 3.89 टक्के वाढून 4,043 रुपयावर बंद झाले आहे. पारस डीफेन्स एण्ड स्पेस टेक्नॉलॉजीस आणि सेन्टम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने ही चंद्रयान-3 चे अनेक महत्वाची उपकरणे तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.