Marathi News National This action is a revenge play, ready to sacrifice for Shiv Sena, what did Sanjay Raut say after being detained by ED?
Sanjay Raut: ही कारवाई सूडनाट्यातून, शिवसेनेसाठी बलिदान देण्यास तयार, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?
ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून, नेत्यांना पक्ष बदलण्यास किंवा शरणागती पत्करायला भाग पाडले जाते. या अटकेतून त्यांना नवी प्रेरणा मिळेल, असे राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेसाठी बलिदान देण्याची तयारी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई – पत्राचाळ प्रकरणात ईडीने केलेली कारवाई ही केवळ सूडनाट्यातून करण्यात आल्याचा आरोप शिवसेना (Shiv sena)खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी दिली आहे. 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या भांडुपच्या राहत्या घरातून ईडीने (ED) ताब्यात घेतले आहे. या सगळ्या काळात शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मरेन पण झुकणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. भगवे उपरणे घालून राऊत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर घरातून बाहेर पडले. अत्यंत आत्मविश्वासानं ते शिवसैनिकांना सामोरे गेले. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून, नेत्यांना पक्ष बदलण्यास किंवा शरणागती पत्करायला भाग पाडले जाते. या अटकेतून त्यांना नवी प्रेरणा मिळेल, असे राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेसाठी बलिदान देण्याची तयारी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी tv9ला फोनरुन प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..
जो कभी हार नहीं मानता!
झुकेंगे नही!
जय महाराष्ट्र pic.twitter.com/lp7VXzqtmj
जी काय कारवाई व्हायची ती होऊ द्या मी घाबरत नाही ही राजकीय सोडायला चाललेली कारवाई आहे माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत शिवसैनिकांचा बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो तो शिवसेनेमुळे आणि हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही निधड्या छातीने उभा राहतो कुणी काहीही म्हणू द्या त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जातोय यातूनच महाराष्ट्राला सुद्धा बळ मिळेल राजकीय चुडाच्या कारवायाच्या महाराष्ट्रात सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांवर फक्त त्यांनाही यातून बळ मिळणार आहे आमच्यासारखी ही काही लोक आहेत जी न झुकता न डरता कारवाईला सामोरे जातात आणि लढाई लढतात आणि या अशा कारवाईंच्या भीतीने अनेक लोक पक्ष सोडून जातात शरणागती पत्करतात संजय राऊत असा नाही मरण पण झुकणार नाही वाकणार नाही शिवसेना सोडणार नाही
बलिदान देण्याची तयारी – राऊत
कोणतीही कागदपत्र माझ्याकडे सापडलेली नाहीत जे काय पत्राचाळ वगैरे म्हणतायेत कोणता पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे मला माहित नाही ती चाळ कुठे आहे मला माहित नाही तरी ठरलेला आहे की शिवसेना मोडायची तोडायची माझा आवाज बंद करायचा उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं त्यासाठी ही कारवाई सुरू आहे अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही माझ्यावरच्या कारवाईतून शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळेल असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे
करही नाही आणि डरही नाही – राऊत
ईडीचे अधिकारी आपल्या महाराष्ट्रातील देशातीलच आहे त्यामुळे त्यांना सहकार्य करायला पाहिजे खासदार आहे त्यामुळे आम्हीच कायदे बनवतो मला कायद्याचे महत्त्व कळतं सुडाच्या बदल्याच्या भावनेने आणि शिवसेनेला संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावरती कारवाई सुरू आहे बाळासाहेब ठाकरे यांचा मी जवळचा सहकार्य होता हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे बाळासाहेबांचे लढण्याचे सगळे गुण आमच्या मध्ये आलेले आहेत मी डरपोक नाही कर नाही तर डर कशाला असा एक प्रश्न मगाशी कोणीतरी विचारला त्यांना सांगतो कर नाही नाही आणि डरही नाही नाही आणि शेवटपर्यंत पक्ष सोडणार नाही
लढा देत राहू – राऊत
अनेकांना वेळ वाढवून दिला जातो अधिवेशन सुरू आहे मात्र मला कोणतीही नोटीस न देता पहाटे ईडीच्या अधिकारी माझ्या घरी आलं माझ्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेलं मात्र आम्ही लढा लढत आहोत सर्व शिवसैनिक आमच्या सोबत आहेत
महाराष्ट्रानं पेटून उठावं
मी सहा महिन्यापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून माझ्यावरती कसा दबाव आणला जातो हे कळवलं होतं ते सरकार पाडण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे आणि मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल ही सर्व माहिती मी उपराष्ट्रपती व्यंकय नायडू यांना दिली होती आणि भविष्यामध्ये मी आत असेल किंवा बाहेर त्याची मला परवा नाही याही पेक्षा मोठे स्पोर्ट मी करत राहील तेव्हा भारतीय जनता पक्षाला कळेल की लढाई काय आहे माझ्यावरती काही आरोप नाहीयेत आरोप खोटे आहेत महाराष्ट्राने उठून उभा राहावं महाराष्ट्र हालच्या पेशांचा महाराष्ट्र नाही महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे धन्यवाद जय महाराष्ट्र