Kashmir Target killing | काश्मिरात जगण्याचाच संघर्ष, शिक्षक, बँक मॅनेजर, मजुराची हत्या, स्थानिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
काश्मीरमधील ही स्थिती पाहता, गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. मागील तीन दिवसात तीन निरपराध नागरिकांचा बळी काश्मीरातील दहशतवाद्यांनी घेतला.
काश्मीर. भारताचा स्वर्ग. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेकजण काश्मीर खोऱ्यात (Kashmir Vallie) जातात. पण याच स्वर्गातील नागरिकांना नरकयातना देण्यासाठी दहशतवाद्यांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. भारतीय जवान त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असतानाच आता या दहशतवाद्यांनी (Terrorist) सामान्यांना टार्गेट करणं सुरु केलं आहे. मागील तीन दिवसातच तीन नागरिकांची हत्या झाली. मृतांच्या घरी स्मशान शांतता आहे तर उर्वरीत काश्मीरमध्ये हिंदुंचा (Hindu) आक्रोश वाढतोय. हिंदू नागरिक तेथून पलायनाच्या तयारीत आहेत. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवानच सुरक्षित नाहीत तर आमच्यासारख्या नागरिकांचं काय होईल, असा सवाल ते करतायत. काश्मीरमधील ही स्थिती पाहता, गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. मागील तीन दिवसात तीन निरपराध नागरिकांचा बळी काश्मीरातील दहशतवाद्यांनी घेतला. पाहुयात सविस्तर…
बडगाम जिल्ह्यात बिहारचा दिलकुश कुमारची हत्या
दहशतवाद्यांनी गुरुवारी म्हणजेच 02 जून रोजी दोन मजुरांना गोळी घातली. यात एका मजुराचा मृत्यू झाला. मध्य काश्मीरच्या चडूरा भागातील वीट भट्टीवरही मजुरांवर गोळ्या झाडल्या गेल्या. ही घटना रात्रीची होती. यात दिलकुश कुमार आणि गुरी जखमी झाले. गुरीला उपचारनंतर घरी सोडण्यात आलं. मात्र 17 वर्षीय दिलकुशचा रुग्णालयातच मृत्यू झाला. दिलकुशकुमार मूळ बिहारचा होता. काश्मीरमध्ये मे महिन्यापासून दहशतवादयांनी 9 नागरिकांना टार्गेट करून त्यांची हत्या केली आहे.
Jammu and Kashmir LG Manoj Sinha arrives at the Ministry of Home Affairs in Delhi
Union Home Minister Amit Shah has called a meeting with top officials on security in Jammu & Kashmir, today pic.twitter.com/Y5oHmkXrMu
— ANI (@ANI) June 3, 2022
कुलगाव जिल्ह्यात विजय कुमारचा पत्ता शोधत आले..
दोन जून रोजीच कुलगाम जिल्ह्यातही एका नागरिकाची हत्या झाली. लष्कर ए तैयबा संघटनेच्या दहशतवाद्यांनी बँक परिसरात मूळ राजस्थानचा असलेला बँक कर्मचारी विजय कुमार याची गोळी झाडून हत्या केली. त्याच्या हत्येचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. विजय कुमार दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील EDB बँकेतील अरेह मोहनपोरा ब्रँचमध्ये मॅनेजर होता. तो किरायाने एका घरात राहत होता. दहशतवादी त्याचा पत्ता शोधत आले आणि तेथेच गोळी झाडली. रुग्णालयात जातानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. विजय कुमारचे वडीलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबतच नाहीयेत. विजयकुमार 2019 मध्येच बँकेत भर्ती झआला होता. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याचं लग्न झालं होतं. पुढच्या महिन्यात तो राजस्थानला येणार होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
31 मे रोजी महिला शिक्षिकेवर हल्ला
दहशतवाद्यांनी 31 मे रोजी हिंदू महिला शिक्षिकेवरही गोळी झाडली आणि तिची हत्या केली. तिचं वय 36 वर्षे होतं. कुलगाम जिल्ह्यातील गोपालपूरमधील एका सरकारी शाळेत ती शिकवत होती. या शिक्षिकेची हत्या केल्यानंतर प्रधानमंत्री पॅकेजअंतर्गत तैनात काश्मिरी पंडित समुदायात संतापाची लाट पसरली होती. आमची सुरक्षा वाढवली नाही तर आम्हाला काश्मीर खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायन करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र स्थितीत फार सुधारणा झाली नसल्याने अनेक काश्मीरी कुटुंब स्थलांतर करत आहेत.