कोरोनाला थोपवण्यासाठी दिल्लीमध्ये महायज्ञ, 350 पेक्षा जास्त यजमानांना मंत्रोच्चारणासाठी आमंत्रण

या महायज्ञासाठी 350 पेक्षा अधिक यजमानांना पूजा आणि मंत्रोच्चारणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. (mahayagya organized to stop corona spreading)

कोरोनाला थोपवण्यासाठी दिल्लीमध्ये महायज्ञ, 350 पेक्षा जास्त यजमानांना मंत्रोच्चारणासाठी आमंत्रण
दिल्लीमध्ये अशा प्रकारे महायज्ञ करण्यात आला.
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 8:28 PM

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रोज हजारो रुग्ण नव्याने आढळत आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळे प्रतिबंधात्मक नियम लागू केले जातायत. मात्र, तरीसुद्धा कोरोना आळा घालणे शक्य होत नाहीये. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून शनिवारी दिल्लीत महायज्ञ करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. (to stop Corona spreading Mahayagya organized by Vishwa Hindu Parishad Ashok Singhal foundation and Namo Sadbhavana Samiti in Delhi)

कोरोनाची दुसरी लाट आणि तिचा कहर कमी करण्यासाठी हा महायज्ञ करण्यात आला. दिल्लीतील छतरपूरमध्ये विश्व हिंदू परिषद, अशोक सिंघल फाऊंडेशन आणि नमो सद्भावना समितीतर्फे या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 350 पेक्षा अधिक यजमानांना पूजा आणि मंत्रोच्चारणासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

या मायज्ञाविषयी बोलताना “पूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत आहे. म्हणून विश्व कल्याणालासमोर ठेवून या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांती महायज्ञमध्ये 12 हवनकुंडसाहित चार वेदांच्या नावाचे द्वार बनवण्यात आले होते,” असे आयोजकांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांमध्ये रोज हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. दिल्लीमध्ये मागील 24 तासांत 3,567  नवे कोरोना रुग्ण आढळले. एका दिवसात एकूण 2,904 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दिल्लीमध्ये दिवसभरात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या दिल्लीमध्ये  12,647 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,060 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Nashik Corona Update | कोरोनाला थोपवण्यासाठी मास्टर प्लॅन, बाजारात खरेदीसाठी आता पास लागणार, नवे नियम कोणते?

Corona Cases and Lockdown News LIVE : मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ, दिवसभरात 9090 नवे कोरोनाबाधित

कामाची बातमी! UMANG App वरून घर बसल्या तपासा PF बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(to stop Corona spreading Mahayagya organized by Vishwa Hindu Parishad Ashok Singhal foundation and Namo Sadbhavana Samiti in Delhi)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.