दिल्ली शेतकरी आंदोलन टूलकिट प्रकरण, दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी, कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट' प्रकरणात अटकेत असलेली 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीच्या जामीन अर्जावर आज पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी होणार आहे. (toolkit disha ravi case)
दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘टूलकिट’ प्रकरणात अटकेत असलेली 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी च्या (Disha Ravi) जामीन अर्जावर आज पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिशा रवीची पाच दिवसांची कोठडी शुक्रवारी (19 फेब्रवारी) संपल्यानंतर तिला पुन्हा तीन दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान तिच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. (today toolkit disha ravi case will hear in patiala house)
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केलेलं आहे. त्यानंतर या प्रकरणात शंतनु मुकुल आणि निकिता जैकब या व्यक्तींचासुद्धा सहभाग असल्याचा दावा यापूर्वी पोलिसांनी केला आहे. या संशयितांची चौकश करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केलेली आहे.
दिशा रवीचे तपासात सहकार्य नाही
दिशा रवीला अटक केल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र, ती तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तसेच तपासादरम्यान ती उडवाउडीवीच उत्तरं देत असून आपल्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पोलिसांनी यापूर्वी कोर्टाला सांगितलं आहे. तिचे सहकारी मुकुल आणि जैकब यांना 22 फेब्रुवारी रोजी तपास संस्थेसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलंय. त्यासाठी पोलिसांनी तशी याचिकासुद्धा केली आहे. याच याचिकेचा विरोध दिशा रवीच्या वकिलांनी केला असून दिशाला मुक्त करण्याची मागणी तिच्या वकिलांनी केला आहे. याच याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नेमका प्रकार काय?
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केलेलं ाआहे.. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी हेच टूलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. भारतात द्वेष निर्माण करण्यासाठी दिशाने खलिस्तान समर्थक ग्रुप पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी हात मिळवणी केल्याचाही आरोप दिशा रवी यांच्यावर आहे. ही टूलकिट संपादित करणाऱ्यांपैकी दिशा एक असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.
‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीकाhttps://t.co/foOREqFnFz#nanapatole | #Congress | #BJP | #prasadlad | #coronavirus | #CoronaVirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
इतर बातम्या :
कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!