Tomato Price : टोमॅटोने संसारात लावली ‘आग’, या चुकीमुळे पत्नी लालेलाल, पतीच्या घराला ठोकला रामराम

Tomato Price : टोमॅटाने तर आता अजूनच कहर केला आहे. रोजच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस वैतागला आहे. त्यातच टोमॅटोमुळे आता किचनमध्ये पण भांडणं सुरु झाली आहेत. रागा रागात या पत्नीने तर पतीच्या घराला रामराम ठोकला आहे.

Tomato Price : टोमॅटोने संसारात लावली 'आग', या चुकीमुळे पत्नी लालेलाल, पतीच्या घराला ठोकला रामराम
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 3:20 PM

नवी दिल्ली : टोमॅटोच्या वाढत्या किंमती (Tomato Price Hike) भारतात आता राष्ट्रीय मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारची यामुळे झोप उडाली आहे. भाजीपालाचे दर वाढले आहेत. त्यात टोमॅटोने सर्वाधिक चपळता दाखवली. टोमॅटो तर काही ठिकाणी 200 रुपयांचा टप्पा गाठून पुढे पळाले आहे. लाखो लोकांनी टोमॅटो खाणे कमी केले अथवा बंद केले आहे. तर सोन्यासारखी टोमॅटोची खरेदी सुरु आहे. 4-4 किलो टोमॅटो घेणारे आता एक पाववरच समाधान मानत आहे. किंमतीचं सोडा, इथं टोमॅटोमुळे वैवाहिक आयुष्यात वादळं येऊ लागली आहेत. टोमॅटोमुळे संसार उद्धवस्त होत आहेत. हो अगदी, खरंय. टोमॅटोमुळे किचनमध्ये भांडणं लागली आहेत. रागा रागात एका पत्नीने तर पतीचे (Wife Left Home) घरच सोडून दिलं आहे. पतीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आता टोमॅटो अजून काय दिवस पाहायला लावतो काय माहिती?

कुठे घडली घटना ही घटना मध्यप्रदेशात घडली. शहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलीस ठाण्यातंतर्गत बेमहौरी नावाचं गाव आहे. येथील संजीव वर्मा हे छोटासा ढाबा चालवितात. तसेच ते टिफिन सर्व्हिस पण चालवितात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आयुष्यात हे मोठं वादळ आलं. त्यांच्या एका कृतीमुळे पत्नी थेट घर सोडून निघून गेली.

काय केली चूक संजीव वर्मा यांनी पत्नीला न विचारता भाजीत तीन टोमॅटो चिरुन टाकले. पत्नीला ही गोष्ट माहिती होताच, ती रागाने लालबुंद झाली. संजीव वर्मा यांच्यावर ती प्रचंड संतापली. तिने रागा रागात लहान मुलीला सोबत घेऊन घर सोडले. तिला थांबविण्याचा संजीव वर्माने आटोकाट प्रयत्न केला. पण पत्नीचा पारा चढलेला होता. संजीवच्या भावना तिच्यापर्यंत पोहचल्याच नाही. तनक्यातच तिनं घर सोडले.

हे सुद्धा वाचा

गाठले पोलीस स्टेशन पत्नी रागाच्या भरात निघून गेल्याने संजीव वर्मा आता चिंताग्रस्त झाला आहे. तिने मुलीला पण सोबत नेले. संजीवने पत्नीचा नातेवाईकांकडे शोध घेतला. काहींना संपर्क केला. तिच्या माहेरी चौकशी केली. पण तिचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे संजीवने तातडीने धनपुरी पोलीस ठाणे गाठले आणि पत्नीला शोधण्याची विनंती केली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीची नोंद घेतली आहे. टोमॅटोमुळे पत्नी सोडून गेली, अशी तक्रार पती संजीवने दिली आहे.

काय घेतली शपथ आता एवढं महाभारत या टोमॅटोमुळे घडल्याने संजीवने प्रचंड धसका घेतला आहे. त्याने जीवनात आता कधीच टोमॅटो खाण्याचे सोडा, त्याला हात पण लावणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा घेऊन टाकली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.