जगात सर्वात जास्त ट्रॅफीक जाम असलेल्या टॉप 10 शहरात, मुंबई किंवा दिल्ली नव्हे या दोन शहरांचा समावेश

टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा ( Tomtom Traffic Index 2023 ) अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार लंडन हे जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेले शहर असल्याचे उघड झाले आहे. तर या टॉप 10 यादी आपल्या देशातील दोन शहरांचा समावेश झाला आहे. त्यात मुंबई किंवा दिल्ली ही शहरे नाहीत. तर पाहा कोणत्या शहराचं नाव पुढे आले आहे.

जगात सर्वात जास्त ट्रॅफीक जाम असलेल्या टॉप 10 शहरात, मुंबई किंवा दिल्ली नव्हे या दोन शहरांचा समावेश
traffic jamImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 2:59 PM

नवी दिल्ली | 4 फेब्रुवारी 2024 : जगातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या शहारांपैकी मुंबई एक शहर आहे. त्यामुळे मुंबईत सर्वाधिक ट्रॅफीक जामचा सामना करावा लागतो असा तुमचा समज असेल तर हे चुकीचे आहे. जगातील सर्वात जास्त ट्रॅफीक जाम होणाऱ्या शहरांची पाहणी झाली असता आपल्या देशातील दोन शहरांचा क्रमांक जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असणाऱ्या टॉप 10 शहरात आला आहे. परंतू ही शहरे राजधानी दिल्ली किंवा आर्थिक राजधानी मुंबई नसून भारतातील दोन प्रसिद्ध महानगरे आहेत. पुणे शहर ट्रॅफीक जाममध्ये जगातल्या दहा प्रमुख शहरात समाविष्ट झाले आहे. Tomtom Traffic Index 2023 मध्ये लंडन हे जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेले शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. तर या यादीत भारतातील बंगळुरु हे सहाव्या क्रमांकावर तर पुणे हे सातव्या क्रमांकावर आले आहे.

टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा ( Tomtom Traffic Index 2023 ) अहवाल समोर आला आहे. यात सर्वाधिक ट्रॅफीक जाम होणाऱ्या शहरांच्या टॉप 10 सूचीत मुंबई किंवा दिल्लीचा समावेश झालेला नाही. साल 2023 मध्ये जगभरातील ट्रॅफीक जामच्या स्थितीचा अभ्यास करुन आलेल्या अहवालात आपल्या देशातील पुणे आणि बंगळुरु या दोन शहरात सर्वाधिक ट्रॅफीक जाम असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सने 55 देशातील 387 शहरात सरासरी प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन यावर आधारित मुल्यांकन करीत हे निष्कर्ष काढले आहेत. हा डेटा कार आणि स्मार्टफोनच्या नेव्हीगेशन सिस्टीमच्या आधारे जमा केला गेला. त्यानुसार लंडन शहर साल 2023 मध्ये गाडी चालविण्याच्या बाबतीत सर्वात रखडपट्टीचे शहर निघाले. लंडन येथे पिकअवरमध्ये कारचा वेग सरासरी 14 किमी प्रती तास इतका मंदावला होता. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशातील Oklahoma City हे शहर या यादीत सर्वात शेवटी आहे. या शहरात वाहतुकीचा वेग ताशी 61 किलोमीटर एवढा होता.

पुण्याचा वेग ताशी 19 किमी

जगात सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या टॉप 10 शहरात बंगळुरु सहाव्या क्रमांकावर तर पुणे सातव्या क्रमांकावर आले आहे. बंगळुरु शहरात साल 2023 मध्ये प्रति दहा किमी प्रवासासाठी सरासरी 28 मिनिट 10 सेंकदाचा वेळ लागला होता. तर पुण्यात याच अंतरासाठी सरासरी 27 मिनिट 50 सेंकद लागले होते. पुण्यात कारचा वेग ताशी 19 किमी इतका मंदावला होता. गेल्यावर्षी बंगळुरु येथे प्रवास करण्यासाठी सर्वात वाईट दिवस 27 सप्टेंबर होता. येथे 10 किमी ड्राईव्ह करण्यासाठी सरासरी 32 मिनिटे खर्च करावी लागली. पुणे शहरात आठ सप्टेंबरला 10 किमी अंतर कापण्यासाठी सरासरी 34 मिनिटे लागली होती. या यादीत दिल्लीचा क्रमांक 44 वा तर मुंबईचा क्रमांक 54 वा आहे.

दिल्ली आणि मुंबईची स्थिती

दिल्लीत 2023 मध्ये 10 किमी अंतर कापण्यासाठी सरासरी 21 मिनिट 40 सेंकद आणि मुंबईत याच अंतरासाठी  21 मिनिट 20 सेंकद वेळ लागला. साल 2022 च्या तुलनेत साल 2023 मध्ये ट्रॅफीक निर्देशांकाचे विश्लेषण केलेल्या 387 शहरांपैकी 228 शहरात सरासरी वेग कमी झाला आहे. TomTom ने इंधनाच्या किमती गोळा केलेल्या 351 शहरांपैकी 60 टक्क्यांहून अधिक शहरांमध्ये 2021 ते 2023 दरम्यान सरासरी इंधन बजेट 15 टक्के किंवा त्याहून अधिक वाढले. TomTom ने इंधनाच्या किमती गोळा केलेल्या 351 शहरांपैकी 60 टक्क्यांहून अधिक शहरांमध्ये 2021 ते 2023 दरम्यान सरासरी इंधन बजेट 15 टक्के किंवा त्याहून अधिक वाढले.

सर्वाधिक ट्रॅफीक असलेली शहरं

1. लंडन

2. डबलिन

3. टोरंटो

4. मिलान

5. लीमा

6. बंगलुरु

7. पुणे

8. बुखारेस्ट

9. मनीला

10. ब्रसेल्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.