कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा, त्यावर भाजपचा झेंडा, विरोधकांची टीका, पण नियम काय?
कल्याणसिंग यांनीच अशी इच्छा व्यक्त केली होती की, संघ आणि भाजपाचे संस्कार माझ्या रक्तात मिसळलेत. माझी अशी इच्छाय की, माझ्या जीवनाचा अंत होईल तेव्हा माझं पार्थिव भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याट लपेटलेलं असावं.
एका फोटोची देशभरात चर्चा सुरुय. हा फोटो आहे भाजपचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या पार्थिवाचा. फोटोवर चर्चेपेक्षा वाद जास्त होतोय. काँग्रेसपासून सपापर्यंत सर्व जण टिका करतायत. सोशल मीडियावरही फोटोमुळे भाजपवर जोरदार टिका केली जातेय. ह्या फोटोत कल्याणसिंग यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलंय. त्यानंतर त्याच तिरंग्यावर भाजपचा ध्वजही ठेवण्यात आलाय. त्यावरुनच भाजप वादाच्या केंद्रस्थानी आहे. हा फोटो कल्याणसिंग यांचं पार्थिव लखनौच्या निवासस्थानी ठेवलं होतं. त्यावेळेसचा आहे.
कल्याणसिंग यांचं दिर्घ आजारानंतर निधन झालय. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत. 1990 च्या काळात उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता मिळवून देण्यात कल्याणसिंग यांचा सिंहाचा वाटा होता. कल्याणसिंग यांना अलिकडेच बाबरी विध्वंस प्रकरणी दोषमुक्त केलं गेलं होतं. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याणसिंगही बाबरी प्रकरणी आरोपी होते. इतर 32 जणही आरोपी होते.
विरोधकांची टिका कल्याणसिंग, तिरंगा आणि त्यावर भाजपचा ध्वज असा फोटो फेसबूक, ट्विटरसह जवळपास सर्वच सोशल मीडियावर चर्चिला जातोय. यूथ काँग्रेसनं भाजपवर टिका करताना ट्विट केलंय की, देश राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी ट्विट करत सवाल केलाय की, नव्या भारतात राष्ट्रीय ध्वजाच्यावर पार्टीचा झेंडा लावणं योग्य आहे? तर समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी म्हटलंय, देशाच्या वर पार्टी, तिरंग्याच्यावर पक्षाचा झेंडा, भाजपला नेहमीप्रमाणे ना पश्चाताप, ना कुठले दु:ख.
कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर भाजपचा झेंडा का? आता मुळ प्रश्नावर येऊ. कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर भाजपचा झेंडा का ठेवला गेला होता? याचं उत्तर आहे, कल्याणसिंग यांची इच्छा. कल्याणसिंग यांनीच अशी इच्छा व्यक्त केली होती की, संघ आणि भाजपाचे संस्कार माझ्या रक्तात मिसळलेत. माझी अशी इच्छाय की, माझ्या जीवनाचा अंत होईल तेव्हा माझं पार्थिव भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याट लपेटलेलं असावं.
नियम काय सांगतो? भारतीय ध्वज संहिता, कलम 2.2 मध्ये असं सांगितलं गेलंय, कोणताच झेंडा राष्ट्रध्वजाच्या वर, त्यापेक्षा जास्त उंच किंवा साईडमध्ये ठेवू नये. ज्यावर झेंडा फडकवला जातो, त्याच्यावर फूल, माळा, किंवा इतर कुठलेही प्रतिक, वस्तू ठेवली जाऊ नये.
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती सरळसेवेनं करा, डी.एड. बी.एड. धारक आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण