Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदार विधानसभेत पोर्न व्हिडीओ पाहताना पकडला, सीसीटीव्हीत सारंकाही कैद; आता व्हिडीओ व्हायरल

त्रिपुराच्या विधानसभेत अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजपच्या एक आमदार अधिवेशन सुरू असताना पोर्न व्हिडिओ पाहत असताना पकडला गेला आहे.

भाजप आमदार विधानसभेत पोर्न व्हिडीओ पाहताना पकडला, सीसीटीव्हीत सारंकाही कैद; आता व्हिडीओ व्हायरल
MLA Jadab Lal NathImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 2:34 PM

अगरतळा : त्रिपुरात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा सत्तेत पुनरागमन केलं. कम्युनिस्टांचा गड समजल्या जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने दुसऱ्यांदा सत्ता बळकावली आहे. त्यामुळे भाजपचं बळ वाढलेलं आहे. मात्र, या सत्तेला नजर लागावी असा एक प्रकार घडला आहे. भाजपच्या एका आमदाराच्या व्हिडीओमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना खुर्चीवर बसून भाजपचा हा आमदार पोर्न व्हिडीओ पाहत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा आमदार तर ट्रोल होतच आहे. पण या प्रकारामुळे भाजपचीही चांगलीच नाचक्की झाली आहे.

हा व्हायरल व्हिडीओ आजचाच असल्याचं सांगितलं जात आहे. त्रिपुरातील बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जादब लाल नाथ हे विधानसभा सुरू असताना पोर्न व्हिडीओ पाहताना दिसून येत आहेत. जादब लाल नाथ विधानसभेत आपल्या जागेवर बसले आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते मोबाईलवर पोर्न व्हिडीओ पाहताना दिसत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कामकाज सुरू असतानाच

भाजप आमदार जादब लाल नाथ यांच्यावर विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच पोर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जादब लाल नाथ यांनी त्यांच्यावरील आरोप अजून नाकारलेला नाहीये. किंवा त्यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. या व्हिडिओमुळे ते चांगलीच अडचणीत आले आहेत. शिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

मोठा विजय मिळवला

जादब लाल नाथ हे बागबासा विधानसा मतदारसंघातील आमदार आहे. सीपीएमचा बालेकिल्ला असलेल्या बागबासामधून त्यांनी मोठा विजय मिळवला होता. 2018च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता. या मतदारसंघात 2018मध्ये सीपीएमचे नेते बिजिता नाथ यांनी भाजपचे प्रदीप कुमार नाथ यांना 270 मतांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर भाजपने 2023च्या निवडणुकीत जादब लाल नाथ यांना तिकीट दिलं होतं. तिकीट मिळाल्यानंतर जादब लाल नाथ यांनी विजयी होण्याची किमयाही करून दाखवली.

सीपीएमचा बालेकिल्ला ढासळला

जादब लाल नाथ यांनी बागबासा येथील सीपीएमचा किल्ला ढासळला. तसेच बिजिता नाथ यांची विजयी घोडदौडही थांबवली. या निवडणुकीत त्यांनी बिजिता नाथ यांना 1400 मतांच्या फरकाने पराभूत केलं होतं. यावेळी तृणमूलचे बिमल नाथ तिसऱ्या तर टिपरा मोथा पार्टीच्या कल्पना सिन्हा या चौथ्या क्रमांकावर होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.