Biplab Kumar Deb resigns : भाजपची खांदेपालटाची परंपरा त्रिपुरातही कायम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देव यांचा राजीनामा

राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्यपालांकडे देव यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मात्र निवडणुका जवळ आल्या असताना हा निर्णय घेतल्याने राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

Biplab Kumar Deb resigns : भाजपची खांदेपालटाची परंपरा त्रिपुरातही कायम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देव यांचा राजीनामा
भाजपची खांदेपालटाची परंपरा त्रिपुरातही कायम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देव यांचा राजीनामाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 4:48 PM

नवी दिल्ली : त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री विप्लव देव (Biplab Kumar Deb resigns) यांनी राजीनामा दिला आहे. 8 महिन्यांनंतर राज्यात निवडणुका होणार आहेत. देव हे चार वर्षांपासून राज्याचे नेतृत्व करत होते. भाजपा, इंडिजिनस पीपुल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या सरकारचा चार वर्षांचा कारभार त्यांनी केला. राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्यपालांकडे देव यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. राज्यात आठ महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजपाने केलेला दिसतोय. 2023च्या निवडणुकांपूर्वी (Tripura Elecitons) हा मोठा निर्णय मानण्यात येतो आहे. विप्लव देव यांची शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी भेट झाली होती. दरम्यान केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे अगरतलाला पोहचले आहेत. राज्यातील आमदारांची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे, त्या बैठकीत ते सहभागी होतील. याच बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाववर शिक्कामोर्तब होणार आहे.

राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी सर्वोपरि आहे. हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी आपले पद सोडले. नवा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

राजीनाम्याचे कारण काय असू शकते?

बिप्लव देव यांच्याबाबत पक्ष संघटनेत नाराजी आहे. दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेतील कोणतेही पद स्वीकारू शकतात.

विनोद तावडे यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती

महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका पार पडणार असल्यामुळे आता तावडे त्रिपुराची कमान कशी संभाळणार? याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत. मात्र भाजप नेते विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीटही देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता त्यांच्यावर त्रिपुरात मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.