त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात, अमित शाहांना भाजपचा पक्षविस्तार नेपाळ, श्रीलंकेतही हवा

भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असं अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचं देब यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. (Biplab Deb Amit Shah BJP)

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात, अमित शाहांना भाजपचा पक्षविस्तार नेपाळ, श्रीलंकेतही हवा
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 10:00 AM

आगरतळा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केलं. त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना बिप्लब देब यांनी शाहांचा मनोदय व्यक्त केला. (Tripura CM Biplab Deb claims Amit Shah wishes to expand BJP in Nepal Sri Lanka)

भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असं अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचं देब यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. रवींद्र सतबर्षिकी भवनात बिप्लब देब यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अमित शाह यांचे नेतृत्व आणि भारताच्या सीमा उल्लंघून भाजपचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनाला देब यांनी दाद दिली.

‘जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा ते त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आले होते. आमची एका गेस्ट हाऊसमध्ये भेट झाली. आम्ही गप्पा मारत होते. तेव्हा भाजपचे उत्तर-पूर्व झोनल सचिव अजय जमवालही होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं जमवाल म्हणाले. तेव्हा अमित शाह म्हणाल होते, की अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत. आपल्याला शेजारी देशांमध्येही पक्षाचा विस्तार करायचा आहे. तिथेही विजय मिळवायचा आहे.’ असं मुख्यमंत्री बिप्लब देब भाजप कार्यकर्त्यांना सांगत होते.

‘ज्यांच्याकडे इतकी ऊर्जा आहे, असा दृष्टीकोन आहे, ते बोलत आहेत की भाजपला जगभरात विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. असा विक्रम फक्त कम्युनिस्टांनी नोंदवला आहे.’ असंही बिप्लब देब म्हणाले.

अमित शाहांवर टीका करणारं शिवसैनिकाचं पत्र

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी शिवसेनेवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक भावनिक पत्र लिहिल्याची अफवा सोशल मीडियावर उठली होती. मात्र हे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिलेलं नसून एका शिवसैनिकाने ते उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचं नंतर समोर आलं. या पत्रात अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांवर निशाणा साधण्यात आला. ‘गुजराती’ गृहमंत्र्यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेला संपवण्याची भाषा केली आहे. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला.

संबंधित बातम्या:

शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?

Fact Check: अमित शाहांवर टीका करणारं ते पत्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना लिहिलं की शिवसैनिकानं उद्धवना?

(Tripura CM Biplab Deb claims Amit Shah wishes to expand BJP in Nepal Sri Lanka)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.