बिहारमध्ये कोण कुणाला फोडणार?, भाजप-जेडीयूला की दोन्ही मिळून काँग्रेसला?; की दोन्ही फुटणार?

बिहारमध्ये जेडीयू-भाजप सरकार येऊन अवघे दोन महिने होत नाहीत तोच आता फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. (Trouble for in Bihar politcs)

बिहारमध्ये कोण कुणाला फोडणार?, भाजप-जेडीयूला की दोन्ही मिळून काँग्रेसला?; की दोन्ही फुटणार?
नितीश कुमार
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 2:18 PM

पाटणा: बिहारमध्ये जेडीयू-भाजप सरकार येऊन अवघे दोन महिने होत नाहीत तोच आता फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्यात संख्याबळात आरजेडी पहिल्या, भाजप दुसऱ्या आणि जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राज्यातील नंबर वनचं स्थान मिळवण्यासाठी जेडीयूने काँग्रेस आमदारांभोवती जाळं फेकलं आहे. या जाळ्यात काँग्रेसचे आमदार अडकणार की काँग्रेसच जेडीयूचे आमदार फोडणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (Trouble for in Bihar politcs)

बिहार विधानसभेत एकूण 243 सदस्य आहेत. त्यात आरजेडीचे 75, भाजपचे 74, जेडीयूचे 43 आणि काँग्रेसचे अवघे 19 आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरत सिंह यांनीच काँग्रेसचे 11 आमदार फुटून जेडीयूमध्ये सामिल होणार असल्याचा दावा केला आहे. खुद्द काँग्रेस नेत्यानेच हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावर कांग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. उलट जेडीयूचेच 15 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. जेडीयूमध्ये लवकरच फूट पडेल आणि राज्यात यूपीएचं सरकार येईल, असं आझाद यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार यांचं दबाव तंत्र

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दबाव तंत्राला हे आमदार वैतागले आहेत. तर भाजप लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या वावड्या उठवल्या जात असून त्यात काही तथ्य नसल्याचं आझाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष मजबूत आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदी राहायचं असेल तर त्यांना एनडीएमध्येच राहावं लागणार असल्याचं सर्वांना माहीत आहे. भाजप आघाडीचा धर्म पाळत नसल्याचं नितीश कुमार यांना माहीत आहे. पण त्यांना त्यांचं सरकार वाचवायचं आहे. त्यामुळे ते नाईलाजाने गप्प आहेत, असा चिमटा काँग्रेसचे बिहार प्रवक्ता आणि आमदार अजित शर्मा यांनी सांगितलं. भाजपने जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सात आमदार फोडल्याने दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण झाल्याचा दावाही शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान, बिहारमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी फोडाफोडीचे संकेत दिल्याने कोण कुणाचे आमदार फोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप जेडीयूचे आमदार फोडणार? की भाजप-जेडीयू मिळून काँग्रेसला फोडणार? की दोन्ही पक्षाचे आमदार फुटणार? याबाबत राजकीय तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. (Trouble for in Bihar politcs)

संबंधित बातम्या:

जनादेश नितीश कुमारांविरोधात, फक्त 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपद कसे? राजदचा सवाल

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी

(Trouble for in Bihar politcs)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.