तोंडाने पेपर सोडवत BTec केले, नंतर 50 लाखांची नोकरी धुडकावली, तुहिनची अनोखी कहाणी

सर्व अवयव नीट असूनही धडधाकट माणूस थोडाशा अपयशाने खचून जातो. परंतू ज्याला दोन्ही हात नाही.त्या एका दिव्यांगाने तोंडाने पेपर सोडवत बीटेक केले आहे. त्याने पन्नास लाखांची नोकरी ठोकरली आहे. ती ही केवळ ज्ञानलालसेने....

तोंडाने पेपर सोडवत BTec केले, नंतर 50 लाखांची नोकरी धुडकावली, तुहिनची अनोखी कहाणी
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 7:23 PM

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करु शकतो. पश्चिम बंगालचा दिव्यांग तुहिन याची कहाणी अशीच काहीशी आहे. आपण जीवनात थोड्याशा जरी अडचणी आल्या तरी आपण नशिबाला दोष देत रडत बसतो. परंतू आपण एका अशा हिमंतवान तरुणाची गोष्ट वाचणार आहोत. या दिव्यांगाला दोन्ही हात नसल्याने ते पेन आणि पेन्सिल तोंडाने पकडून लिहीतात. त्यांनी असा अभ्यास करीत कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक डिग्री घेतली आहे. पश्चिम बंगाल येथील खडगपूर येथील तुहिन यानी महिना चार लाखांची नोकरी देखील धुडकावली आहे. काय आहे या मागील कारण पाहा….

तुहिन यांनी साल २०१७ मध्ये खडगपूर आयआयटी स्थित केंद्रीय विद्यालयातून माध्यमिक परीक्षा दिली. त्यांनी राजस्थान कोटे येथून उच्च माध्यमिक परीक्षा दिली. त्यानंतर शिवपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक डिग्री घेतली. हाताने लिहीता येत नसले तरी तुहिन याने परीक्षेत कधी लेखनिक ( रायटर )सुविधा घेतली नाही. त्यांनी आपल्या तोंडात पेन धरुन आपले पेपर दिले आहेत.

तुहिन केवळ पेन्सिल किंवा पेन तोंडात धरून अभ्यास करीत नाहीत तर ते तोंडाने लॅपटॉपवर टायपिंग देखील करतात. त्यांच्यासाठी धडधाकट व्यक्तींप्रमाणे हे माध्यम हाताळणे असते. तुहीन म्हणतात की मी तोंडाने सामान्य पेन किंवा पेन्सिलने लिहीतो.मला परीक्षेदरम्यान जास्त अधिक वेळ देखील मागत नाही.तोंडाने चित्र काढणे किंवा कॉम्प्युटर चालविणे माझ्यासाठी काहीही अवघड नसल्याचे तुहीन सांगतो.

हे सुद्धा वाचा

५० लाखांचे पॅकेज ठोकरले

तुहिन यांची पुढच्या वर्षी फेब्रुवारीत एमटेकची प्रवेश परीक्षा आहे आणि त्याची तयारी ते करीत आहेत. तुहिन यांची इच्छा जास्तीत जास्त ज्ञानप्राप्ती करण्याची आहे. माझे ध्यैय्य नोकरी करण्याचे नाही. मला अंतराळ यानावर संशोधन करायचे आहे. त्यामुळे त्यांनी कॉलेज कँपसमध्ये झालेल्या मुलाखती पन्नास लाखाच्या नोकरीचे पॅकेजही नाकारले आहे. तुहिन यांच्या आई सुजाता यांनी सांगितले की मुलांचे रोजचे दैनंदिन काम करावे लागते. मात्र तो अभ्यासात प्रचंड हुशार आहे आणि खूपच मेहनती आहे. तुहिनला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपती आणि राज्यपालांनी देखील पुरस्कार दिल्याचे सांगताना सुजाता यांच्या डोळ्यात मुलाचे कौतूक झळकते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.