AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#MyIndiaMyDuty | कर्तव्य बजावणाऱ्या समाजातील रिअल हिरोंचे फोटो पाठवा

तुम्ही या प्रजासत्ताक दिनी तुमचं कर्तव्य योग्य रितीने पार पाडणार याची शपथ घ्या #MyIndiaMyDuty (TV9 Marathi campaign on Republic Day)

#MyIndiaMyDuty | कर्तव्य बजावणाऱ्या समाजातील रिअल हिरोंचे फोटो पाठवा
My India My Duty
| Edited By: | Updated on: Jan 26, 2021 | 1:37 PM
Share

प्रजासत्ताक दिन…( Republic Day ) प्रजेचं राज्य सुरु झाल्याचा ऐतिहासिक क्षण. अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि अखेर इंग्रजांना माघार घ्यावी लागली. 15 ऑगस्ट 1947 ला भारतानं स्वातंत्र्याचा (Independence Day) सूर्य पाहिला…आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला हे प्रजेकडून, प्रजेसाठी प्रजेचं राज्य सुरु झालं. देशात हजारो लोक असे आहेत, जे प्रजासत्ताक टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना ते अधिक मजबूत करण्यासाठी जिवाचं रान करताना पाहायला मिळतात. मात्र, 130 कोटींच्या या देशात त्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. हेच पाहता या प्रजासत्ताक दिनी, आपण सर्व शपथ घेऊया कर्तव्यनिष्ठेची. यासाठीच ‘टीव्ही 9 मराठी’ची सर्व भारतीयांसाठी खास मोहिम #MyIndiaMyDuty (TV9 Marathi special campaign on Republic Day #MyIndiaMyDuty )

तुम्हीही समाजासाठी रोज काही ना काही योगदान देता. तुमचं कार्य तुमच्या पुरतं वा काही लोकांपुरतं मर्यादितच राहतं. हेच कार्य आम्ही तुम्हाला देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्याची संधी देत आहोत. तुमच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित देशभर कर्तव्यनिष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होईल. मी रोज कचराकुंडीतच टाकतो, मी कधीही सिग्नल मोडला नाही या साध्या गोष्टींपासून ते तुम्ही समजासाठी दिलेल्या मोठ्या योगदानापर्यंतची तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहचवा. किंवा तुम्ही या प्रजासत्ताक दिनी तुमचं कर्तव्य योग्य रितीने पार पाडणार याची शपथ घ्या, आणि त्याचा व्हिडीओ शूट करुन तो #MyIndiaMyDuty या हॅशटॅगने फेसबुकवर पोस्ट करा आणि फेसबुकवर @TV9marathi ला टॅग करा.

‘टीव्ही9 च्या’ माध्यमातून तुमची ही शपथ अनेकांपर्यंत पोहचेल. ही मोहिम देशातील तरुणांमध्ये देशप्रेमासह कर्तव्यनिष्ठा जागृत करण्यास अत्यंत उपयोगी ठरणार आहे. याची प्रेरणा घेऊन अनेकजण आजपासूनच कर्तव्यबाबत जागृत होतील. आणि एक कर्तव्यनिष्ठ नागरिकाप्रमाणं आपल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडलीत. प्रत्येक नागरिकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव होणं, हेच प्रजासत्ताक दिनाचं मोठं यश असणार आहे. चला तर लगेच देशाप्रती कर्तव्यनिष्ठतेची शपथ घेतानाचा व्हिडीओ शूट करा आणि फेसबुकवर #MyIndiaMyDuty या हॅशटॅगखाली आणि @TV9marathi ला टॅग करुन पोस्ट करा. (TV9 Marathi special campaign on Republic Day #MyIndiaMyDuty)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या : 

Republic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ; व्हिडीओ पाहिलात का?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.