AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आज ग्लोबल साऊथ देशांचा आवाज बनतोय; WITT मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला देशाच्या विकासाचा लेखाजोखा

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

भारत आज ग्लोबल साऊथ देशांचा आवाज बनतोय;  WITT मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला देशाच्या विकासाचा लेखाजोखा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2025 | 6:45 PM
Share

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ‘जगाची चिंता करताना भारताने इंटरनॅशनल सोलर अलायन्स देऊन त्यावर तोडगा काढला आहे. त्यामुळे आता लहानातील लहान देशही सस्टेनेबल एनर्जीचा लाभ ऊठवू शकेल. याचा क्लायमेटवर परिणाम होईलच पण साऊथ देशातील एनर्जीची गरज देखील सुरक्षित होईल’ असं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी? 

जगाची चिंता करताना भारताने इंटरनॅशनल सोलर अलायन्स देऊन त्यावर तोडगा काढला आहे. त्यामुळे आता लहानातील लहान देशही सस्टेनेबल एनर्जीचा लाभ ऊठवू शकेल. याचा क्लायमेटवर परिणाम होईलच पण साऊथ देशातील एनर्जीची गरज देखील सुरक्षित होईल. या उपक्रमात जगातील 100 हून अधिक देश भारतासोबत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जग ग्लोबल ट्रेडमध्ये आहे. असंतुलन आणि लॉजिस्टिकशी संबंधित समस्यांचा सामना करत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठीही भारताने जगाशी मिळून नवीन प्रयत्न सुरू केले आहेत. आयमॅक हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प कॉमर्स आणि इकोनॉमीच्या माध्यमातून आशिया आणि मिडल ईस्टशी जोडला जाणार आहे. यातून आर्थिक फायदा होणार आहेच, पण त्यासोबतच जगाला पर्यायही मिळणार आहे. त्यामुळे ग्लोबल सप्लाय चेंज अधिक मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्लोबल सिस्टिमला पार्टिसिपेटिव्ह आणि डेमोक्रॅटिक करण्यासाठी भारताने अनेक पावलं टाकली आहेत. याच भारत मंडपममध्ये जी २० समिट झाली होती. त्यात आफ्रिकन युनियनला जी20 चे परमनंट मेंबर बनवलं. हे ऐतिहासिक पाऊल होतं. याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. भारताच्या अध्यक्षतेखाली ही मागणी पूर्ण झाली. ग्लोबल डिसिजन मेकिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये भारत आज ग्लोबल साऊथच्या देशाचा आवाज बनत आहे. आंतरराष्ट्रीय योगा डे, डब्लूएफए, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी फ्रेमवर्क अनेक क्षेत्रात भारताने आपली उपस्थिती मजबूतीने दाखवली आहे. ही अजून सुरुवात आहे. ग्लोबल प्लॅटफॉर्मवर भारताचं सामर्थ्य वाढणार आहे.

२१ व्या शतकातील २५ वर्ष उलटले आहेत. यातील ११ वर्ष आमच्या सरकारने देशाची सेवा केली. जेव्हा आम्ही व्हाट इंडिया थिंक्स टुडेचा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आपल्याला हे ही पाहिलं पाहिजे की भूतकाळात काय प्रश्न होते आणि काय उत्तर होते. त्यामुळे टीव्ही 9 च्या प्रेक्षकांनाही अंदाज येईल आपण कशापद्धतीनं आत्मनिर्भरतेकडे आणि विकासाकडे पोहोचलो आहोत, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.