AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्विटरचा झटका, रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट तासभर लॉक नंतर अनलॉक, माहिती तंत्रज्ञान मंत्री संतापले? नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय कायदा आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट कापीराईट कायद्याचे अल्लंघनासंदर्भात ब्लॉक करण्यात आलं होतं.

ट्विटरचा झटका, रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट तासभर लॉक नंतर अनलॉक, माहिती तंत्रज्ञान मंत्री संतापले? नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 4:24 PM

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट कापीराईट कायद्याचे अल्लंघनासंदर्भात ब्लॉक करण्यात आलं होतं. एका तासानंतर अकाऊंट सुरु झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी याबाब अकाऊंट लॉक असताना आणि अनलॉक करण्यात आल्यानंतरचे स्क्रीन शॉट शेअर करत ट्विटरवर आरोप केले आहेत. (Twitter locks Ravi Shankar Prasad handle over violation of Copyright norms for one hour)

रविशंकर प्रसाद काय म्हणाले?

रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट करत मित्रांनो! आज अत्यंत विचित्र काहीतरी घडले. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपानुसार ट्विटरने जवळजवळ एका तासासाठी लॉगीन करण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर जवळपास एका तासानंतर त्यांनी खातं अनलॉक केल्यानंतर लॉगीन करता आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ट्विटरची ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा 2021च्या नियम 4(8) चं उल्लंघन करते. ट्विटरनं माझ्या खात्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यासंबंधीची नोटीस द्यायला हवी होती त्यांनी से केलं नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले. ट्विटरवर करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भातील वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरसंबंधात विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या क्लिपचा परिणाम समोर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही टेलिव्हिजन चॅनेल आणि कोणत्याही अँकरनं कॉपीराईट नियमांचं उल्लंघण झाल्याती तक्रार केली नाही.

ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनं नाही

ट्विटरनं केलेली कृती ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या बाजून नसल्याचं समोर आलं आहे. त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा असल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोणत्याही प्रकारे नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लागू करण्यात आलेले नियम मान्य करावे लागतील, त्या बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मोहन भागवत यासह इतर नेत्यांच्या खात्याची ब्लू टिक हटवली होती. तक्रार केल्यानंतर ब्लू टिक पुन्हा देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

WhatsApp Controversy | सोशल मीडियाबाबतच्या नव्या नियमांमुळे नागरिकांनी घाबरू नये : केंद्र सरकार

बाळासाहेबांच्या आदर्शाला जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, भाजपची टीका

App Elyments | व्हिडीओ कॉल ते ई-पेमेंट, भारताचं पहिलं सोशल मीडिया अ‍ॅप ‘एलिमेंट्स’ लाँच

(Twitter locks Ravi Shankar Prasad handle over violation of Copyright norms for one hour)

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...