काश्मीर खोऱ्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची मोठी कारवाई

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोएबाशी संबंधित होते. ते काश्मीर खोऱ्यात अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते.

काश्मीर खोऱ्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 7:39 PM

श्रीनगर : देशात सणासुदीची धामधूम सुरु असताना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे. याचवेळी भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दले सतर्क आहेत. दहशतवाद्यां (Terrorist)ना जशास तसे उत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये आज झालेल्या चकमकी (Encounter)त लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.

चकमकीत दोन दहशतवादी ठार

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोएबाशी संबंधित होते. ते काश्मीर खोऱ्यात अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. त्यांच्या सक्रियतेबाबत लष्कराला गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे लष्कराने विशेष शोध मोहीम हाती घेतली होती.

संपूर्ण परिसरात नाकाबंदी

सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु

मागील काही महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याचाही प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बीएसएफ जवानांनी सियालकोटचा रहिवासी मोहम्मद शबद याला अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करताना पाहिले होते. त्यानंतर लष्कराने गोळीबार केला आणि त्याची घुसखोरी रोखली होती. त्यावेळी लष्कराला त्याच्याकडून काही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळले नव्हते.

त्याआधी 25 ऑगस्टलाही पाकिस्तानच्या एका घुसखोराने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान बीएसएफने तस्करीचा मोठा डाव हाणून पाडला होता. सांबा जिल्ह्यात सीमेवर पाकिस्तानी घुसखोराकडून लष्कराने आठ किलो संशयित हेरॉईन जप्त केले होते. यादरम्यान घुसखोरालाही गोळी मारण्यात आली. जखमी अवस्थेत तो पाकिस्तानच्या सीमेवर परत येण्यात यशस्वी झाला होता. (Two terrorists killed in Kashmir Valley, A major operation by the army)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.