अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने शहर हादरलं.. ती दारोदार भटकत पण मदतीसाठी कुणीच आलं नाही

पीडित मुलगी मदतीसाठी दारोदार भटकत होती, तिच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. पण कोणीच दार उघडून तिला दिलासा दिला नाही, ना कोणी मदतीसाठी पुढे आले. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण असून सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने शहर हादरलं.. ती दारोदार भटकत पण मदतीसाठी कुणीच आलं नाही
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 5:38 PM

उज्जैन | 27 सप्टेंबर 2023 : धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये (ujjain) माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. तेथे एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीतील निर्भया घटनेच्या थराराक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. उज्जैनमध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमांचे व्रण होते. तिचे कपडे रक्ताने माखलेले होते.

अर्धवस्त्र अवस्थेतील ती मुलगी रस्त्यावर फिरत मदत मागत होती, तासनतास दारोदार भटकत होती पण कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.  पोलिसांना या घटनेची मिळताच त्यांनी त्या मुलीला दिलासा दिला त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणीही केली. तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.

पोलिसांनी सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासही सुरू केला आहे. हा निर्घृण अत्याचार करणाऱ्या आरोपींचा पोलिसा कसून शोध घेत असून त्यासाठी पथकही स्थापन करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी ४०० हून अधिक सीसीटीव्हींचे फुटेजही तपासण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मदतीसाठी गल्लोगल्ली भटकत होती चिमुरडी

ही मुलगी मदतीची याचना करत शहरातील गल्लोगल्ली भटकत होती हे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. तिने घातलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले होते. अर्धवस्त्र अवस्थेमध्ये ती सुमारे दोन-अडीच तास रस्त्यावर भटकत होती, मदतीसाठी याचना करत होती पण कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. बराच वेळ भटकल्यानंतर अखेर ती महाकाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्कर येऊन बेशुद्ध पडली. अखेर कोणीतरी पोलिसांना तिच्याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये नेले.

तिची गंभीर अवस्था पाहून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संतापजनक प्रकारामुळे शहरात खळबळ माजली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा होत आहे. रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

मात्र ही मुलगी नेमकी कोण आहे, तिचे पालक कोण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच ती या भागात कशी आली, तिच्यासोबत हे गैरकृत्य कोणी केले हेही ती सांगू शकली नाही. अत्याचारामुळे अति रक्तस्त्राव झाल्याने पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक झाली होती. डॉक्टरांच्या देखरेखीमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.