बिहारमधील रुग्णालयांत आता ‘दीदी की रसोई’; रुग्णांना मिळणार सकस आहार

बिहारमधील जनतेला शासकीय रुग्णालयात उपाचार घेत असताना सकस आहार मिळवा यासाठी 'दिदी की रसोई' ही योजना सुरु करण्यात येणार आहे. (Bihar scheme didi ki rasoi)

बिहारमधील रुग्णालयांत आता 'दीदी की रसोई'; रुग्णांना मिळणार सकस आहार
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 10:14 AM

पाटणा : भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी धडाडीने काम करायला सुरुवात केली आहे. त्यांनी बिहारमधील जनतेला शासकीय रुग्णालयात उपाचार घेत असताना सकस आहार मिळवा यासाठी ‘दिदी की रसोई’ ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी बिहारच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर केला होता. (under the scheme didi ki rasoi Bihar government will give food to patients who admitted in district hospital)

या निर्णयानुसार बिहारमधील जिल्हा तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यांना ‘दिदी की रसोई’ या योजनेंतर्गत सकस आहार दिला जाईल. हा आहार स्वयं सहायता महिला बचत गटांकडून बनवला जाईल.

देश आणि महाराष्ट्राच्या, मोठ्या बातम्यांचं बुलेटीन, पाहा देश महाराष्ट्र , दररोज संध्या. 7 वा.

वैशाली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर योजनेची सुरुवात

या योजनेची सुरुवात बिहार प्रशासनाने वैशाली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली होती. त्यानंतर बिहार ग्रामीण उपजीविका संवर्धन सोसायटी (BRLPS) अंतर्गत गया, सहरसा, पूर्णिया, बक्सर, शेहर आणि शेखपुरा या जिल्ह्यांमध्ये या योजनेचा विस्तार केला गेला.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमध्ये स्वयं साहाय्यता महिला बचत गटांमधील 10.18 लाख महिला ‘दीदी की रासोई’ या योजनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी या योजनेचा विस्तार अन्य जिल्ह्यात करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये पैसे काढण्यासाठी “मृतदेह” थेट बँकेत, पुढं काय घडलं ?

बिहारच्या शेतकऱ्यांना मोठा झटका, 63 कृषी उपकरणांवरील सब्सिडी रद्द

भाजप मित्र की दुश्मन? बिहारमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत नितीशकुमार

(under the scheme didi ki rasoi Bihar government will give food to patients who admitted in district hospital)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.