केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त
भाजपच्या बड्या नेत्या, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त झाल्या आहेत.
नवी दिल्ली : भाजपच्या बड्या नेत्या, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त झाल्या आहेत. ट्विट करुन आपण कोरोनामुक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच सदिच्छा व्यक्त करणाऱ्या शुभचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत. (Union Minister Smriti Irani Corona Free)
I have tested negative for COVID. Would like to extend my grateful thanks to everyone for their good wishes & prayers.
— Smriti Z Irani (@smritiirani) November 12, 2020
गेल्या महिन्याच्या 28 तारखेला (28 ऑक्टोबर) स्मृती इराणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर नवी दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराअंती आज अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत स्मृती इराणी भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. त्या प्रचारसभांमध्ये सहभागी झाल्या.याचदरम्यान त्या अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं म्हटलं जात होतं.
स्मृती इराणी यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गर्जेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
(Union Minister Smriti Irani Corona Free)
संबंधित बातम्या