Unlock-5 Guidelines | सिनेमागृह, शॉपिंग मॉल उघडण्याची शक्यता, अनलॉक 5 च्या गाईडलाईन्स लवकरच

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु केलं जाण्याची शक्यता आहे. (Unlock-5 Guidelines Cinema Halls tourism likely to be opened)

Unlock-5 Guidelines | सिनेमागृह, शॉपिंग मॉल उघडण्याची शक्यता, अनलॉक 5 च्या गाईडलाईन्स लवकरच
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 12:07 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार येत्या 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक-5 च्या गाईडलाईन्स लागू करणार आहे. या गाईडलाईन्स दरम्यान केंद्र सरकार सिनेमागृह, शॉपिंग मॉल तसेच पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरु करण्याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. (Unlock-5 Guidelines Cinema Halls tourism likely to be opened)

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय काही निर्बंध शिथील करु शकतं, असं बोललं जात आहे. तसेच आगामी बिहार निवडणुका पाहता केंद्राकडून येत्या काही दिवसात अनलॉक – 5 च्या गाईडलाईन्स जारी केल्या जाऊ शकतात.

विशेष म्हणजे सणांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर निर्बंध शिथील केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी टाळणे अशा काही अटी-शर्तीद्वारे  ही सूट दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अनेक शॉपिंग मॉल्सलाही या गाईडलाईन्सदरम्यान सूट दिली जाऊ शकते.

सरकार सिनेमागृह सुरु करण्याची परवानगी देऊ शकते!

1 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती आहे. मात्र, मॉल्समधील सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यापूर्वी 21 सप्टेंबरपासून सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असं बोललं जात होतं. मात्र यावर सरकारने शिक्कामोर्तब केलेले नव्हतं. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

शाळा-कॉलेज उघडणार की नाही?

शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. तसेच शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.

दरम्यान देशात कोरोनाबाधितांची संख्या ही 60 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 94 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हा गेल्या सात दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 46 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 1000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Unlock-5 Guidelines Cinema Halls tourism likely to be opened)

संबंधित बातम्या : 

नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला

एनडीए स्थापन झालेलं कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले, शिवसेनेची टीका

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.