UP MLC Election Result 2022 : चक्क वाराणसीत भाजप उमेदवाराची जमानत जप्त, माफियाच्या पत्नीला आमदारकी, यूपीत उलटफेर!
27 पैकी 24 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. असं असलं तरी एका महत्वाच्या जागेवर मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा समावेश आहे!
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला चारी मुंड्या चित करत भाजपनं पुन्हा एकदा आपला झेंडा उंचावला आहे. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत (UP MLC Election) भाजपला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यात 36 पैकी 9 जागांवर भाजपनं बिनविरोध विजय मिळवला. उर्वरित 27 जागांसाठी निवडणूक झाली. त्याचा निकाल आज लागला. 27 पैकी 24 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. असं असलं तरी एका महत्वाच्या जागेवर मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा समावेश आहे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वाराणसीसह भाजपला विधान परिषदेच्या 3 जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे. वाराणसीमध्ये माफिया आणि आमदार बृजेश सिंह यांच्या पत्नी अन्नपू्र्णा सिंह अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी भाजप उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. वाराणसी-चंदौली आणि भदोही या विधान परिषदेच्या जागेवर भाजप उमेदवार सुदामा पटेल यांना पराभव पत्करावा लागलाय. यात विजयी उमेदवार अन्नपूर्णा सिंह यांना 4 हजार 234 मतं मिळाली, समाजवादी पार्टीचे उमेदवार उमेश यादव यांना 345 तर भाजप उमेदवार सुदामा पटेल यांना केवळ 170 मतं मिळाली आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल
UP MLC Election Results 2022
Total seats – 36
BJP – 33 JSD -01 IND -02 SP -00 BSP-00 Congress -00
Akhilesh Yadav drawing blank is the Highlight of these elections.
— BJP, Yanam. (@yanam_bjp) April 12, 2022
ब्रजेश सिंह यांचा भाजपला झटका
मागील दोन दशकांपासून वाराणसी विधान परिषदेची जागा ब्रजेश सिंह यांच्या ताब्यात आहे. 2016 च्या विधान परिषद निवडणुकीत ब्रजेश सिंह स्वत: मैदानात उतरले होते. त्यांना भाजपनं उमेदवारी दिली नव्हती. त्यावेळी भाजपच्या सुदामा पटेल यांनी बाजी मारली होती. मात्र, आता वाराणसीच्या तुरुंगात असलेल्या ब्रजेश सिंह यांनी पत्नीला अपक्ष म्हणून उभं करत भाजपचा पराभव केलाय.
प्रतापगढमध्येही भाजपचा पराभव
प्रतापगढमध्येही भाजप उमेदवाराचा पराभव झाला. भाजपचे माजी आमदार हरिप्रताप सिंह यांचा राजा भैया यांच्या पक्षाचे उमेदवार अक्षय प्रताप सिंह उर्फ गोपाल भैया यांनी पराभव केलाय. अक्षय प्रताप हे बाहुबली नेते आणि कुंडाचे आमदार रघुराज प्रताप सिंह यांचे नातेवाईक आहेत.
इतर बातम्या :