SP MLC Candidates: सपाचा पुन्हा उत्तर प्रदेशात MY फॉर्म्यूला, सब कुछ यादव, दाखवायला दोन मुस्लीम?

उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाची तारीख वाढवण्यात आली आहे.

SP MLC Candidates: सपाचा पुन्हा उत्तर प्रदेशात MY फॉर्म्यूला, सब कुछ यादव, दाखवायला दोन मुस्लीम?
अखिलेश यादवImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 4:26 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता विधान परिषद (MLC Election) निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मुस्लीम यादव समीकरण राबवण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत यादव आणि मुस्लिमांना मोठ्या प्रमाणावर तिकीट दिल्यानंतर समाजवादी पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मुस्लिम-यादव समीकरणावर भर दिला आहे. 36 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाने आतापर्यंत 18 उमेदवार जाहीर केले असून 14 यादव आणि दोन मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. एमवाय समीकरण राबवणाऱ्या अखिलेश यादव यांनी 18 जागांवर उमेदवार जाहीर केले असून त्यात 14 यादव आणि केवळ 2 मुस्लीम उमदेवार दिले आहेत.

अखिलेश यादव यांनी MY समीकरण बदललं

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘MY’ समीकरणाची व्याख्या बदलल्याचा दावा केला होता. ‘एम’चा अर्थ महिला आणि ‘वाय’चा अर्थ तरुण असा केला होता. मात्र, निवडणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम आणि यादव उमेदवारांचा विजय झाल्यानंतर पक्षाने पुन्हा आपल्या मूळ मतदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. 36 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाने आतापर्यंत 18 उमेदवार जाहीर केले असून 14 यादव आणि दोन मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे.

विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी निवडणूक

उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या 36 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाची तारीख वाढवण्यात आली आहे. आता राज्यातील उमेदवारांना 19 मार्चऐवजी 21 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. विधान परिषदेच्या 36 जागांसाठी 9 एप्रिलला निवडणूक होणार असून 12 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहेत. विधानपरिषदेत समाजवादी पक्षाच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे राज्यात विधान परिषदेच्या एकूण 100 जागा आहेत.

अखिलेश यादव यांनी कुणाला तिकिट दिलंय़

समाजवादी पक्षाने आतापर्यंत 18 उमेदवारांना तिकीट जाहीर केलं आहे. अखिलेश यादव यांच्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. सपानं लखनौ-उन्नावमधून सुनील सिंग साजन, बाराबंकीमधून राजेश कुमार यादव, अलाहाबादमधून वासुदेव यादव, मथुरा-एटा-मैनपुरीमधून उदयवीर सिंग, बहराइचमधून अमर यादव, वाराणसीमधून उमेश कुमार यादव, पिलीभीत-शहामधून अमित यादव यांना उमेदवारी दिली आहे. प्रतापगडमधून विजय बहादूर यादव, आग्रा-फिरोजाबादमधून दिलीप सिंह यादव आणि गोरखपूर-महाराजगंजमधून रजनीश यादव यांना तिकीट देण्यात आले आहे.

दोन मुस्लीम उमेदवारांना तिकीट

रामपूरचे मस्कूर अहमद आणि गोरखपूरचे डॉ. कफील यांना तिकीट दिले आहे. झाशी-जालौनमधून श्याम सुंदर सिंह यादव, बस्ती-सिद्धार्थनगरमधून संतोष यादव सनी, फैजाबादमधून हिरालाल यादव आणि मऊ-आझमगडमधून राकेश कुमार यादव यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

इतर बातम्या:

NARENDRA MODI कडून जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा ‘कृष्णपंख’ भेट, जाणून घ्या कृष्ण पंखाची खासियत ?

Gehlot on Nashik Crime | निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात कुंभाड; राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोतांच्या मुलाचे स्पष्टीकरण

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.