UPSC Success story : चहाच्या टपरीवर काम करणारा जेव्हा आधी IPS आणि मग IAS होतो

कोणतीही अवघड गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. सहजच कोणतीही गोष्ट मिळत नाही. यूपीएससी सारखी परीक्षा जर पास करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि चिकाटी हवीच. तरच या परीक्षेत पास होता येतं. एक चहा विक्रेता आयपीएस आणि आयएएस अधिकारी होतो. कोण आहेत ते अधिकारी.

UPSC Success story : चहाच्या टपरीवर काम करणारा जेव्हा आधी IPS आणि मग IAS होतो
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 6:15 PM

UPSC EXAM : एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकता. यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी देखील तेच लागतं. जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टीच्या आधारावर या परीक्षेत पास होता येतं. या परीक्षा पास होण्यासाठी अनेकजण म्हणतात की, कोचिंग क्लासेस शिवाय हे शक्य नाही. पण देशात असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांंनी कोणत्याही कोचिंग शिवाय या परीक्षेत यश मिळवलं आहे.गरिबीचा सामना करणाऱ्या कुटुंबातील मुले देखील यात यशस्वी होतात. अशाच एका मुलाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचे वडील मजूर होते. तो स्वतः चहा विकायचा पण आता तोच आयएएस अधिकारी झाला आहे.

शाळेत जाण्यासाठी रोज ७० किमीचा प्रवास

हिमांशू गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. शाळेत जाण्यासाठी दररोज ते 70 किमीचा प्रवास करत होते. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी एकेकाळी चहाच्या दुकानात देखील काम केले. उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने UPSC परीक्षा (UPSC Civil Service Exam) उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले.

यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ताचे वडील रोजंदारीवर काम करायचे. पैसे कमावण्यासाठी ते चहाचा टपरीही चालवत असत पण त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कधीही तडजोड केली नाही.

सलग तीन वेळा परीक्षा पास

हिमांशू गुप्ता यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, जेव्हा त्याची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) साठी निवड झाली. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. आणि त्यानंतर 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.

हिमांशू गुप्ता म्हणतात – ‘मी शाळेत जाण्यापूर्वी आणि नंतर माझ्या वडिलांसोबत काम करायचो. शाळा 35 किमी अंतरावर होती, येण्या-जाण्याचे अंतर 70 किमी होते. जेव्हा माझे वर्गमित्र आमच्या चहाच्या स्टॉलजवळून जायचे तेव्हा मी लपून बसायचे. पण एकदा कोणीतरी मला तिथे पाहिलंच आणि माझी चेष्टा करायला सुरुवात केली. मला ‘चायवाला’ म्हटले जाऊ लागले. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना मदत केली. आमचे घर चालवण्यासाठी आम्ही मिळून दिवसाला ४०० रुपये कमवायचो.

‘माझी स्वप्न मोठी होती’

‘पण माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले होते. पप्पा अनेकदा म्हणायचे, ‘स्वप्न साकार करायचे असेल तर अभ्यास कर!’ मी तेच केले. मला माहीत होते की जर मी कठोर परीश्रम घेतले तरच मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळेल. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटाच्या DVD विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.