Success Story: वयाच्या 21 व्या वर्षी विना कोचिंग UPSC मध्ये 13 वी रँक, IAS अन् IPSची नोकरी फेटाळली, निवडले…

UPSC Success Story vidushi singh: चाचणी मालिका, मॉक टेस्ट आणि स्वत: केलेला अभ्यास हे यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे दुवे आहेत. जर आपण स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहिलो आणि परिश्रमपूर्वक तयारी केली तर आपण कोचिंगशिवायही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.

Success Story: वयाच्या 21 व्या वर्षी विना कोचिंग UPSC मध्ये 13 वी रँक, IAS अन् IPSची नोकरी फेटाळली, निवडले...
vidushi singh
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 12:57 PM

UPSC Success Story: भारतीय संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक करण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. ही परीक्षा क्रॅक केल्यावर रँकमध्ये आलेले उमेदवार आयएएस किंवा आयपीएसची निवड करतात. परंतु काही जण या पारंपारीक पद्धतीऐवजी आपली वेगळी वाट निवडतात. ही वेगळी वाट निवडणारी आयएफएस (इंडियन फॉरेन सर्व्हीस) विदुषी सिंह आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी कोणताही कोचिंग न लावता यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. काय आहे विदुषी सिंह यांची सक्सेस स्टोरी…

कोचिंग लावले नाही…

विदुषी यांचा जन्म राजस्थानमधील जोधपूरमध्ये झाला. परंतु त्यांचा परिवाराचे नाते अयोध्येशी आहे. विदुषी यांनी यूपीएससीची तयारी करताना कोचिंग क्लास लावला नाही. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकातून स्वत: अभ्यास सुरु केला. त्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. त्यातही त्यांना 13 वी रँक मिळाली. त्यांनी अर्थशास्त्र हा ऐच्छिक विषय म्हणून निवडला होता.

हे सुद्धा वाचा

आयएएस ऐवजी का निवडले आयएफएस

चांगली रँक आल्यावर विदुषी यांनी आयएएसची निवड का केली नाही? हा प्रश्न अनेकांना आहे. एका मुलाखतीत विदुषी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भारतीय परराष्ट्र सेवेत सरकारी अधिकारी बनणे हे त्यांच्या आजोबांचे स्वप्न होते. त्यामुळे आपण परराष्ट्र सेवेची निवड केली. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपण अनेक टेस्ट सीरिज आणि मॉक टेस्ट दिल्या होत्या. अभ्यास करण्यासाठी कोचिंगची मदत घेतली नाही. स्वत:च सर्व तयारी केली.

यशाचा हा आहे मंत्र

दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून विदुषी यांनी 2021 मध्ये बीए ऑनर्स (अर्थशास्त्र) पूर्ण केल्यानंतर विदुषीने यूपीएससीची तयारी सुरू केली. यूपीएससी परीक्षेबाबत विदुषी म्हणते की, चाचणी मालिका, मॉक टेस्ट आणि स्वत: केलेला अभ्यास हे यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे दुवे आहेत. जर आपण स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहिलो आणि परिश्रमपूर्वक तयारी केली तर आपण कोचिंगशिवायही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.

“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.