Joe Biden Security: जो बायडन जिथं जातात तिथं थ्री लेयर सिक्युरिटीतच; या सिक्युरिटीला तोडणं केवळ अशक्यच!

G-20 India Summit 2023 Joe Biden Security : प्रत्येक परदेश दौऱ्यात ब्लॅक कलरची ब्रीफकेस कायम जो बायडन यांच्यासोबत असते; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची थ्री लेयर सिक्युरिटी नेमकी कशी? वाचा सविस्तर...

Joe Biden Security: जो बायडन जिथं जातात तिथं थ्री लेयर सिक्युरिटीतच; या सिक्युरिटीला तोडणं केवळ अशक्यच!
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:19 AM

G-20 Summit 2023 : आज आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण G-20 परिषद 2023 ला आजपासून राजधानी दिल्लीत सुरुवात होत आहे. या परिषदेसाठी G-20 चे सभासद असलेल्या देशांचे प्रमुख दिल्लीत दाखल झालेत. आज सकाळी साडे नऊ वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे. या सगळ्यात जगभरात सर्वाधिक चर्चा होतेय ती भारत आणि अमेरिका संबंधांची… कारण या G-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात दाखल झालेत. भारतात येताच काल संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीच्या फोटोंनी आणि व्हीडिओंनी जगाचं लक्ष वेधलं. असं असतानाच आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा. त्यांची सुरक्षा नेमकी कशी असते? जो बायडन यांच्या हातात दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या ब्रीफकेसमध्ये नेमकं काय असतं? जाणून घेऊयात…

जगातील काही नेत्यांना टॉप क्लास सिक्युरिटी दिली जाते. यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे. अमेरिकेचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत चार राष्ट्राध्यक्षांवर हल्ला करत त्यांनी हत्या करण्यात आली. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.

अभेद्य सुरक्षा कवच

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी अभेद्य कवच असतं. ही सुरक्षा तीन लेअरची असते. यात तीन वेगवेगळे सुरक्षेचे कवच असतात. तिसरा लेअर असतो तो पोलिसांच्या सुरक्षेचा. मग दुसरा लेअर असतो तो सिक्रेट सर्विस एजेंट्सचा आणि सर्वात महत्वाचा आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सर्वाधिक जवळ असतं तो प्रोटेक्टिव डिविजन एजेंट्सच्या सुरक्षेचं कवच… ही सिक्युरिटी तोडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या जवळ जाणं केवळ अशक्य असतं.

ब्लॅक ब्रिफकेसमध्ये नेमकं काय?

1901 पासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सीक्रेट सर्व्हिसेस एजंटकडे आहे. हे एजंट अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह या राष्ट्राध्यक्षांना सुरक्षा पुरवतात. त्यांच्याकडे काळ्या रंगाची एक ब्रीफकेस असते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक परदेश दौऱ्यात ही ब्रीफकेस सोबत असते. या ब्रीफकेसमध्ये न्युक्लिअर मिसाईल प्रक्षेपण करण्यासाठीची व्यवस्था असते. राष्ट्राध्यक्षाच्या एखाद्या दौऱ्या दरम्यान अणूबॉम्ब हल्ला झाला. तर त्यावेळी पलटवार करण्यासाठी अणू हल्ला करण्याचा आदेश देता यावा यासाठी ब्रीफकेस सोबत असते.

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.