देशातील ‘या’ राज्यात 2 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, परिस्थिती नियंत्रणात?
भारतात आतापर्यंत 96 लाख 44 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 90 लाख 99 हजार 946 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 40 हजार 216 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6.19 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6.68 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात जगभरात 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू (Covid-19 patients death) झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दररोज 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा बळी जात आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत. भारतातील परिस्थितीदेखील बरी नाही. भारतात आतापर्यंत 96 लाख 44 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 90 लाख 99 हजार 946 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 40 हजार 216 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमधील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे, तर काही राज्य अशी आहेत, जिथे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, असे म्हणता येईल.
देशात सर्वच राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागताच चाचण्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. याबाबतीत उत्तर प्रदेश राज्य (Uttar Pradesh) आघाडीवर आहे. यूपीमध्ये आतापर्यंत 2 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्यांच्या बाबतीत 2 कोटींचा टप्पा ओलांडणारं यूपी हे पहिलं राज्य ठरलं आहे. अशी माहिती वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली आहे. (Uttar Pradesh become first state to conduct over 2 crores covid test)
प्रसाद म्हणाले की, यूपीव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही राज्यात आतापर्यंत इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. यूपीमध्ये शुक्रवारी (4 डिसेंबर) 1,66,938 नमुन्यांची चाचणी (स्वॅब टेस्ट) करण्यात आली. त्यामुळे राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या 2 कोटी 10 लाख 28 हजार 312 इतकी झाली आहे. प्रसाद यांनी माहिती दिल्यानंतर काही वेळाने मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील या आकडेवारीची पुष्टी केली. मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील ट्विटरद्वारे 2 कोटी चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
आज मैं सबसे पहले स्वास्थ्य विभाग को कोविड-19 की इस लड़ाई में सफलतापूर्वक 02 करोड़ से अधिक जांच करने के लिए हृदय से बधाई देता हूं। उत्तर प्रदेश जैसे राज्य में यह अपने आप में किसी उपलब्धि से कम नहीं है: मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) December 5, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांमध्ये एक हजार 940 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 665 झाली आहे, तर 23 कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे उत्तर प्रदेश राज्यात आतापर्यंत 7 हजार 900 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
Uttar Pradesh reports 1940 new #COVID19 cases, 2230 discharges and 23 deaths.
Active cases 22,245 Death toll 7900 Total recoveries 5,22,867 pic.twitter.com/pF7ExFUHv2
— ANI UP (@ANINewsUP) December 5, 2020
दरम्यान, वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 6 कोटी 68 लाख 33 हजार 8 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कोटी 62 लाख 97 हजार 676 रुग्ण बरे झाले आहेत, तर 15 लाख 33 हजार 556 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 90 लाख 71 हजार 795 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 47 लाख 72 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 86 लाख 58 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 85 हजार 550 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 96 लाख 44 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 90 लाख 99 हजार 946 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 40 हजार 216 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश
अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 14,772,535, मृत्यू – 285,550 भारत : एकूण कोरोनाबाधित – 9,644,529, मृत्यू – 139,736 ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,534,951, मृत्यू – 175,981 रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,402,949, मृत्यू – 42,176 फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,268,552, मृत्यू – 54,767 स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,699,145, मृत्यू – 46,252 यूके : एकूण कोरोनाबाधित – 1,690,432, मृत्यू – 60,617 इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,688,939 , मृत्यू – 58,852 अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,454,631, मृत्यू – 39,512 कोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,352,607, मृत्यू – 37,467
संबंधित बातम्या
कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती
30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!
(Uttar Pradesh become first state to conduct over 2 crores covid test)