UP Election : ओबीसी नेत्याचं राजीनामा सत्र सुरुच, मित्र पक्षांनी दबाव वाढवला, अमित शाह यांची तातडीची बैठक
भाजपचं मित्र पक्ष अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्या निर्णयाकडे देखील मोठा लक्ष लागलं आहे. ओबीसी समाजाच्या मोठे नेत्यांनी भाजप सोडल्यानंतर सहयोगी पक्षांनी भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Election 2022) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपला (BJP) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपमधील ओबीसी समाजाचे नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्ष नेतृत्वाची चिंता वाढलीय. अशातच भाजपचे सहयोगी पक्ष निषाद पार्टी आणि अपना दल (Apna Dal)यांनीदेखील दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या आमदारांचं राजीनामासत्र आणि सहकारी पक्षांचं दबावतंत्र यामुळे भाजप समोरील अडचणी वाढल्या आहेत. निषाद पार्टी आणि अपना दल या दोन्ही पक्षांचा ओबीसी समुदायावर प्रभाव असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत जागावाटपावर मंथन केलं आहे.याबाबत आजतकनं वृत्त दिलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी निषाद पार्टी चे अध्यक्ष संजय निषाद आणि अपना दल प्रमुख अनुप्रिया पटेल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपने दोन्ही पक्षांना निवडणुकीच्या काळात सोबत राहण्याचा आवाहन केल्याचं कळतंय. कारण गेल्या दोन दिवसांपासून अपना दल आणि निशांत पार्टीचे नेते देखील समाजवादी पार्टी मध्ये जातील अशी चर्चा होती. यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सक्रिय होत डॅमेज कंट्रोल करण्याची प्रयत्न केला आहे.
ओबीसी मतदारांचा भाजपला फटका?
ओबीसी समुदायामधील स्वामी प्रसाद मौर्य आणि दारासिंग चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. याशिवाय अन्य चार आमदारांनी देखील भाजप सोडली आहे. भाजप सोडणाऱ्या नेत्यांनी दलित, मागास, ओबीसी समाजावर अन्याय आणि भेदभाव केल्याचा आरोप योगी आदित्यनाथ सरकारवर केला आहे. त्यामुळे भाजप 2017 मध्ये जा सोशल इंजिनिअरिंगचा जोरावर विजयी झालं होतं ते सोशल इंजिनिअरिंग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
अपना दलाची 36 जागांची मागणी
भाजपचं मित्र पक्ष अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्या निर्णयाकडे देखील मोठा लक्ष लागलं आहे. ओबीसी समाजाच्या मोठे नेत्यांनी भाजप सोडल्यानंतर सहयोगी पक्षांनी भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी 36 जागांची मागणी केलीय. यामध्ये पूर्वांचल मधील काही जागांसह अवध आणि बुदेलंखड आणि कानपूरमधील जागांचा समावेश आहे, 2017 मध्ये अमित शहा यांनी युतीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अपना दलाला 17 जागांची मागणी केली होती मात्र भाजपने त्यावेळी अकरा जागा दिल्या होत्या. 11 जागांपैकी 9 जागा जिंकत अपना दलाच्या नेत्यांनी स्ट्राईक रेट चांगला असल्याचे देखील दाखवून दिलं होतं. यावेळी अपना दलाच्या नेत्यांची जागांची मागणी वाढवलेली आहे. चोवीस जागांवर अपना दलाची ताकद असल्याचा त्यांचा दावा आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह अॅक्शन मोडमध्ये
स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडल्यानंतर अपना दल एस चे प्रमुख आशिष पटेल यांनी स्वामी प्रसाद मोरे यांनी भाजप आणि एनडीएतून बाहेर जाणं दुःखद आहे. भाजपनं ओबीसी नेत्यांचा आत्मसन्मान लक्षात घ्यायला हवा होता आणि अमित शहा यांना या प्रकरणी लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले होतेय.यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व सक्रिय झालं आणि त्यांनी निषाद पार्टीचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कोर कमिटीच्या बाकी सदस्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, सूनील बन्सल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
आज भाजपच्या सेंटर इलेक्शन कमिटीची बैठक झाल्यानंतर या यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांच्या भाजपवर दबाव 2017 च्या विधानसभेला अपना दलाला 11 जागा दिल्या होत्या त्यापैकी नऊ जागांवर अपना दलानं विजय मिळवला होता. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आठ जागा दिल्या होत्या त्यापैकी त्यांनी चार जागांवर विजय मिळवला होता. ओमप्रकाश राजभर यांनी यावेळी भाजपची साथ सोडून समाजवादी पार्टी सोबत युती केली आहे. यामुळे भाजपशी निषाद पार्टीच्या संजय निषाद यांनी युती केली आहे. अपना दलानं यावेळी जादा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केले. गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या पार्टीचा जनाधार वाढल्याचे मत अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. दुसरीकडे संजय निषाद देखील जादा जागांची मागणी करत आहेत. संजय निषाद यांनी नवी दिल्लीतील बैठकीत 18 जागांची मागणी केल्याचे कळतंय. भाजपला ज्याप्रकारे ओबीसी नेते सोडून जात आहेत त्यामुळे भाजपच्या सहयोगी पक्षांची बार्गेनिंग ताकद वाढली आहे.
इतर बातम्या:
Solapur | सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची पंरपरा, यात्रेचे महत्व जाणून घ्या मुख्य पुजाऱ्यांकडून
हेही पाहा
Uttar Pradesh Election 2022 Apna Dal and Nishad Party bargaining power increased due to Ministers and MLA left party