दैवं इतकंही निष्ठूर नको.. एक महिन्यापूर्वी लग्न, दोन दिवसांपूर्वी नवऱ्याचा मृत्यू, आणि आता…
लग्नं हा प्रत्येक जोडप्यासाठी आनंदाचा क्षण असतो. वर-वधू त्यांच्या भावी आयुष्यासाठी कित्येक स्वप्न रंगवतात. पण दैवाचा खेळ काही वेगळाच असून शकतो. काहीतरी अघटित घडतं आणि सगळी स्वप्नं विस्कटतात.
इटावा | 6 जानेवारी 2024 : लग्नं हा प्रत्येक जोडप्यासाठी आनंदाचा क्षण असतो. वर-वधू त्यांच्या भावी आयुष्यासाठी कित्येक स्वप्न रंगवतात. पण दैवाचा खेळ काही वेगळाच असून शकतो. काहीतरी अघटित घडतं आणि सगळी स्वप्नं विस्कटतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील इटावामध्ये घडली. तेथे एका जोडप्याचं अवघ्या महिन्याभरापूर्वी लग्न झालं. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण क्षणात असं काही झालं ज्याने सगळ्या आनंदाचा विचका झाला आणि घर दु:खात बुडालं. महिन्यापभरापूर्वी लग्न झालेल्या त्या तरूणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नवविवाहीत वधू तिच्या पतीच्या जाण्याचं दु:ख सहन करू शकलं नाही.
संपूर्ण घर शोकाकुल असतानाच त्यांच्यावर दु:खाचा आणखी एक डोंगर कोसळला. पतीच्या जाण्यामुळे खचलेल्या त्या नवविवाहीत महिलेने पतीमागोमाग जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:चही आयुष्य संपवलं. यामुळे त्या घरात दुहेरी दु:खाचं सावट आलं. मुलगा तर गमावला पण त्यापाठोपाठ सूनही गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबांच्या शोकाला पारावार उरला नाही. अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशीच प्रार्थना आता ते कुटुंबिय आणि त्यांचा शोक पाहणारे उतर गावकरी करत आहेत. रडून-रडून सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे.
नेमकं काय झालं ?
यूपीच्या इटावा जिल्ह्यातील बकेवार पोलीस स्टेशन हद्दीतील लखना गावात ही वेदनादायक घटना घडली. या गावात राहणाऱ्या शेखर गुप्ता याचं गेल्याच महिन्यात तृप्ती नावाच्या तरुणीशी लग्नं झालं. घरात नवी सून आल्याने सर्वचं आनंदी होते. मात्र एका घटनेमुळे त्यांचा आनंद झाकोळून गेला. त्या घटनेने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने तिनेही हे जग सोडले. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
महिन्याभरापूर्वी लग्न, पण अपघातात त्याचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखना गावातील रहिवासी शेखर गुप्ता याचा भीषण अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच, दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मात्र मृताच्या पत्नीला हा आघात सहन झाला नाही. तिने तिच्या खोलीत जाऊन गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. घरच्यांना हे समजल्यावर त्यांना मोठा धक्च बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
मुलाच्या मृत्यूच्या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तेव्हाच सुनेनेही असे टोकाचे पाऊल उचलले. पतीच्या मृत्यूचा धक्का त्या महिलेला सहन झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे जीवघेणे पाऊल तिने उचलले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.