लग्नानंतर रात्री पती रूममध्ये आला, पण पत्नीला पाहून बेशुद्धच झाला; कारण ऐकून व्हाल हैराण !
गृहप्रवेश झाल्यानंतर लग्नाच्या रात्री पती त्याच्या रूममध्ये गेला. पत्नी त्याच्यासमोरच होती. मात्र तिला पाहून तो बेशुद्धच झाला. त्या खोलीत नेमकं काय झालं. असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र त्याचा खुलासा झाल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

मुरादाबाद | 12 ऑक्टोबर 2023 : धूमधडाक्यात लग्न लागलं, आप्तेष्टांनी आशीर्वाद दिले, वरातीत नाचून पती-पत्नी घरीही पोहोचले, गृहप्रवेश झाल्यानंतर लग्नाच्या रात्री पती त्याच्या रूममध्ये गेला. पत्नी त्याच्यासमोरच होती. मात्र तिला पाहून तो थेट बेशुद्धच झाला. उत्तर प्रदेशमध्ये ही अजब-गजब घटना घडली आहे. त्या खोलीत नेमकं काय झालं. पतीने असं काय पाहिलं की लग्नाच्या (wedding night) पहिल्या रात्रीच तो बेशुद्ध झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र त्याचा खुलासा झाल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
उत्तर प्रदेश मुरादाबादमध्ये ही घटना घडली. लग्नानंतर एक तरुण आनंदाने पहिल्या रात्री त्याच्या खोलीत गेला, पण तिथे त्याला कळलं की त्याची पत्नी मुलगी नसून ट्रान्सजेंडर आहे. हे कळताच त्याचे तो अवाक झाला. याप्रकरणी तरुणाने पत्नी, मेव्हणा आणि सासऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि खंडणीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ठाकूरद्वारा कोतवाली परिसरातील आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पीडित इसमाच्या सांगण्यानुसार, 4 वर्षांपूर्वी त्याचे बिजनौर जिल्ह्यात लग्न झाले होते. लग्नानंतर रात्री जेव्हा तो पहिल्यांदा रूममध्ये गेला, तेव्हाच त्याला समजलं की त्याची पत्नी मुलगी नसून ट्रान्सजेंडर आहे. याबाबत त्याने पत्नीकडे विचारपूस केली असता पत्नी व सासरच्यांनी मिळून त्याला धमकावले. खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवण्याची धमकीही दिली. यामुळे तो घाबरला, मात्र त्याची पत्नी व सासरच्यांनी या भीतीचा फायदा घेत ते त्याच्याकडून सतत पैसे उकळत राहिले.
थाटामाटात केलं लग्न पण..
पीडित व्यक्तीच्या सांगण्यानुसार, लग्नाच्या वेळी तो मोठ्या थाटामाटात वरात घेऊन बिजनौरला गेला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि पत्नीला घरी आणले. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला पत्नीचं सत्य समजलं. हे वास्तव समोर आल्याने तो हबकलाच. त्याची पत्नी ट्रान्सजेंडर होती. मात्र सध्या आपल्यावर उपचार सुरू असून लवकरच पूर्ण महिला बनू, असे तिने त्याला सांगितले. मात्र रागावलेल्या नवरदेवाने तिच्याशी असलेले संबंध तोडून लग्न मोडण्याचा विषय काढला. हे ऐकताच त्याची पत्नी भडकली आणि तिच्या माहेरच्यांसोबत मिळून त्याला थेट धमकीच दिली.
20 लाख रुपये मागितले
त्यांच्या धमकीला घाबरून तो (पती) गप्प राहिला आणि पत्नीचे उपचार पूर्ण होण्याची वाट पाहू लागला. त्याचदरम्यान, पत्नी आणि सासरच्यांनी त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाही तर तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. एवढचं नव्हे तर पत्नीच्या घरच्यांनी अनेकवेळा घरी येऊन त्याला मारहाणही केली. रोजच्या या छळाला कंटाळून अखेर पीडित इसमाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी 323, 384, 420, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.