Jyoti Maurya Case | टॅलेंटेड ज्योती मौर्य आलोकच्या प्रेमात कशी पडली? कधी सुरु झालेलं अफेअर?

Jyoti Maurya Case | PCS बनण्याधी ज्योतीने किती नोकऱ्या सोडल्या?. ज्या महिलेने दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या, तिला आर्थिक दृष्टया मदतीची काय गरज?. या विवाहबाह्य संबंधात आता नवीन माहिती समोर आलीय.

Jyoti Maurya Case | टॅलेंटेड ज्योती मौर्य आलोकच्या प्रेमात कशी पडली? कधी सुरु झालेलं अफेअर?
PCS Jyoti Maurya NewsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 1:52 PM

नवी दिल्ली : SDM ज्योती मौर्य आणि तिचा नवरा आलोक मौर्य यांचा वाद सध्या चर्चेत आहे. आलोकने पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर अनेक जण आलोकच समर्थन करतायत. पण आलोकही तितका स्वच्छ नाहीय. TV9 भारतवर्षने आलोक मौर्य आणि ज्योती मौर्यच्या कुटुंबियांशी चर्चा केली. आलोकचे वकील हृदय लाल मौर्य यांच्याशी सुद्धा चर्चा केली. यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एक पक्ष ज्योतीचही समर्थन करतोय.

पत्नीच मनीष दुबेसोबत कथित अफेअर असल्यामुळे आलोक डिस्टर्ब झाला. त्याने अफेअरला ज्योतीच्या SDM बनण्याशी जोडलं.

प्रेमसंबंध कधी निर्माण झाले?

SDM बनण्याआधी ज्योतीने दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या. ज्योतीला सर्वातआधी सरकारी शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. त्यानंतर ती समीक्षा अधिकारी बनली. आता प्रश्न हा आहे की, ज्या महिलेने दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या, तिला आर्थिक दृष्टया मदतीची काय गरज?. आलोकने लव्ह विथ अरेंज मॅरेज केलं होतं. त्याची 2008 मध्ये ज्योती मौर्य बरोबर मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोन वर्षांनी 2010 मध्ये आलोकने ज्योती बरोबर लग्न केलं.

नवऱ्यापेक्षा जास्त कमाई

लग्नानंतर ज्योती मौर्यला काहीतरी करुन दाखवायच होतं. त्यासाठी सुरुवातीला आलोकने ज्योतीला मदत केली. काही वर्षानंतर ज्योतीला सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर ज्योती स्वत: कमावू लागली. ज्योती टीचर असतानाच, समीक्षा अधिकारी बनली. त्यावेळी ज्योतीला चांगला पगार होता. ती आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावत होती.

ज्योती मौर्यच्या भावाने काय सांगितलं?

TV9 भारतवर्षने आलोक मौर्य आणि ज्योती मौर्यच्या कुटुंबियांशी चर्चा केली. आलोकने सुरुवातीला ज्योतीच्या अभ्यासावर खर्च केला हे खरय, असं ज्योतीच्या भावाने सांगितलं. पण काही वर्षांनी माझ्या बहिणीला सरकारी नोकरी मिळाली. ती स्वत:च कमवू लागली. ती स्वत:च्या पैशाने शिक्षण घेत होती. आलोकला ती आर्थिक मदत करायची. त्यामुळे तिला एसडीएम बनवण्यासाठी पैसे खर्च केल्याचा आरोप चुकीचा आहे. मी ज्योतीला कोचिंग क्लासला नेऊन सोडायचे, असं आलोकने सांगितलं. त्यावर ज्योती मौर्यच्या भावाच असं सांगणं आहे की, ती स्वत:च स्कुटी चालवायची. ती स्वत: स्कुटीने ये-जा करायची. आलोकचे आरोप ज्योतीच्या भावाने फेटाळून लावले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.