AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफिया ते मच्छर; हे पोलीस सदैव तत्पर! डासांनी हैराण झालेल्या महिलेसाठी पोलिसांनी काय केलं पाहा

संभल जिल्ह्यात एका खाजगी रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली. त्यानंतर महिलेला मध्यरात्री डासांनी प्रचंड हैराण केले. पत्नीला होणारा त्रास पाहून तरुणाने जे केले ते संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले.

माफिया ते मच्छर; हे पोलीस सदैव तत्पर! डासांनी हैराण झालेल्या महिलेसाठी पोलिसांनी काय केलं पाहा
डासांनी हैराण झालेल्या महिलेसाठी पोलिसांची धावImage Credit source: freepik
| Updated on: Mar 22, 2023 | 2:16 PM
Share

संभल : विविध कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे यूपी पोलीस सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. संभल जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेसाठी यूपी पोलीस देवदूत ठरले आहेत. पत्नीला रुग्णालयात मच्छर चावत असल्याने एका तरुणाने यूपी पोलिसांना ट्विट केले. यानंतर काही वेळातच यूपी पोलीस मच्छरचा नाईनाट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मच्छरपासून बचाव करण्यासाठी काही साहित्य त्यांनी संबंधित तरुणाला दिले.

चंदौसी कोतवाली भागातील राज मोहल्ला येथे राहणाऱ्या असद खानने आपल्या गर्भवती पत्नीला वेदना होत असल्याने तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पत्नीची प्रसुती होऊन तिला मुलगी झाली. मध्यरात्री महिलेला मच्छरचा भयंकर त्रास होऊ लागला. यानंतर पतीने यूपी पोलिसांचे 112 आणि संभल पोलिसांना ट्विट करुन आपबीती सांगितली.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

‘माझ्या पत्नीने चंदौसी येथील हरी प्रकाश नर्सिंग होममध्ये एका छोट्या परीला जन्म दिला आहे. पण माझ्या पत्नीला इथे वेदना होत आहेत. बरेच डासही चावत आहेत. कृपया मला ताबडतोब मार्टिन कॉइल प्रदान करा’, असे तरुणाने ट्विट करत पोलिसांना सांगितले. यानंतर तरुणाला यूपी पोलिसांच्या 112 च्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर देण्यात आले आणि काही वेळातच संभल जिल्ह्यातील डायल 112 ची PRV 3955 मॉर्टिन कॉइलसह रुग्णालयात पोहोचली.

यानंतर पोलिसांनी डासांपासून सुटका करण्यासाठी मॉर्टिन कॉइल असद खान याच्याकडे सोपवली. यानंतर तरुणाने संभल पोलिसांचे मनापासून आभार मानले. तरुणाने पुन्हा एकदा या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मार्टिन कॉईल उपलब्ध करून दिल्याबद्दल 112 चे आभार मानले आहेत.

मध्यरात्री यूपी पोलिसांकडून ट्विट करून डासांपासून सुटका करण्यात मदत करणाऱ्या तरुणाने यूपी पोलीस आणि संभल पोलिसांचे आभार मानले. त्यानंतर मिळालेल्या समाधानकारक उत्तरानंतर आता यूपी पोलिसांनीही एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे,’माफियापासून डासांपर्यंत निदान…’

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.