Transformer explodes | भीषण दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, ब्रिजवर करंट पसरुन 15 जणांचा मृत्यू, भारतातील घटना

Transformer explodes | जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. मदतकार्य सुरु झालं आहे.

Transformer explodes | भीषण दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, ब्रिजवर करंट पसरुन 15 जणांचा मृत्यू, भारतातील घटना
transformer explodes on bank of Alaknanda river
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 3:02 PM

चामोली : अलकनंदा नदीच्या तीरावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात अलकनंदा नदी आहे. या दुर्घटनेत पोलीस अधिकाऱ्यासह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. मदतकार्य सुरु झालं आहे.

नमामी गंगा प्रोजेक्टशी संबंधित सीवर ट्रीटमेंट प्लांटचा ट्रान्सफार्मर फाटला. त्यामुळे करंट सर्वत्र पसरुन अनेक लोक होरपळले. ट्रान्सफॉर्मर फाटल्यामुळे साइटवर करंट पसरला. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेच्यावेळी 24 लोक उपस्थित होते. जखमींना डेहराडून येथे शिफ्ट करण्यात आलय.

कोण करणार चौकशी?

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ते स्वत: चामोली येथे जाऊ शकतात. या दुर्घटनेवर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी टि्वट करुन दु:ख व्यक्त केलं. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या दुर्घटनेची न्याय दंडाधिकाऱ्यामार्फत चौकशी होईल.

एसपीनी काय सांगितलं?

चामोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितलं की, “अलकनंदा नदीच्या जवळील ट्रान्सफॉर्मर फाटला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे”

सतत कोसळतोय पाऊस

मागच्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सातत्याने पाऊस कोसळतोय. गंगेसह अनेक नद्यांना पूर आला आहे. या दरम्यान ही दुर्घटना घडली. डोंगराळ भागात मुसळधार वृष्टी सुरु आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागात हजारो पर्यटक खराब हवामान आणि लँडस्लाइडमुळे अडकले आहेत.

भूस्खलनामुळे रस्ते बंद

उत्तराखंडच्या काही भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. भूस्खलनामुळे रस्ते बंद होते. रूद्रप्रयाग येथे पुराच्या पाण्यात एक हॉटेल वाहून गेलं. यात काही जण जखमी झाले आहेत. उत्तरकाशी येथे डोंगरावरुन कोसळलेला ढिगारा थेट टेम्पोवर येऊन पडला. गंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ

डोंगराळ भागात धरणातून सातत्याने पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे हरिद्वार, ऋषिकेशमध्ये नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. हरिद्वारमध्ये गंगेचा जलस्तर 293 मीटरवर पोहोचलाय. गंगेला लागून असलेल्या भागात पुराचा धोका आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.