तिरथ सिंह रावत : कधी आमदारकीचं तिकीट कापलं गेलेल्या अमित शाहांच्या निटकवर्तीच्याकडे राज्याची कमान
2017 मध्ये ज्या नेत्याला आमदारकीचं तिकीटही मिळालं नव्हतं, अशा नेत्याकडे आता संपूर्ण राज्याची जबाबदारी भाजपनं सोपवली आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात उत्तराखंमध्ये सुरु असलेल्या मोठ्या राजकीय हालचाली आज अखेर थांबल्या आहेत. मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? यावर खलबतं सुरु झाली. पण बुधवारीची सकाळ उजाडताच मुख्यमंत्रीपदासाठी तिरथ सिंह रावत यांचं नाव भाजपकडून निश्चित करण्यात आलं. 2017 मध्ये ज्या नेत्याला आमदारकीचं तिकीटही मिळालं नव्हतं, अशा नेत्याकडे आता संपूर्ण राज्याची जबाबदारी भाजपनं सोपवली आहे.(A brief introduction of the newly elected CM of Uttarakhand Tirath Singh Rawat)
पक्षांतर्गत कलहामुळे आमदारकीचं तिकीट कापलं
उत्तराखंडमध्ये मागील विधानसभा निवडणुकीवेळी अंतर्गत कलहामुळे तिरथ सिंह रावत यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं नाही. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. अशावेळी भाजपच्या नेत्यांनी उत्तराखंडची कमान तिरथ सिंह रावत यांच्या हाती सोपवली आहे. राज्याच्या राजकारणात तिरथ सिंह रावत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनच पाहिलं गेलं. पण पक्षांतर्गत राजकारणात टिकू न शकल्याने त्यांना कायम डार्क हॉर्सचीच भूमिका पार पाडावी लागली.
अमित शाहांचे निकटवर्तीय
तिरथ सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमित शाह यांनी 2016 – 17 मध्ये देशातील विविध भागात 120 दिवस यात्रा केली होती. तेव्हा तिरथ सिंह रावत हे त्यांच्यासोबत कायम होते. 2017 मध्ये जेव्हा तिरथ सिंह यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तेव्हा अमित शाह यांनी त्यांना हिमाचल प्रदेशात भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली.
2019च्या लोकसभा निवडणुकीत तिरथ सिंह यांना गढवालमधून तिकीट दिलं आणि ते संसदेत पोहोचले. गढवाल लोकसभा मतदारसंघ व्हिआयपी मानला जातो. कारण याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बीसी खंडुरी निवडणूक लढवतात.
निवडीनंतर रावत काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपदी नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रावत यांनी मीडियाशी संवाद साधला. मी संघासाठी काम करत होतो. भाजपमध्ये येण्याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी सक्रिय राजकारणात आलो, असं रावत म्हणाले. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासोबत मी दीर्घकाळ काम केलं होतं. आधी संघप्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर पार्टी आणि सरकारच्या स्तरावर काम केलं. आजही त्रिवेंद्र सिंह रावत आपले मार्गदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं.
I thank PM, HM & party chief who trusted me, a mere party worker who comes from a small village. I’d never imagined that I’d reach here. We’ll make all efforts to meet people’s expectations & take forward work done in last 4 yrs: Newly appointed Uttarakhand CM Tirath Singh Rawat pic.twitter.com/kxdRtYtfpN
— ANI (@ANI) March 10, 2021
संबंधित बातम्या :
तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!
त्रिवेंद्र सिंह रावत यांचा अखेर राजीनामा, उत्तराखंडमधील भाजपचा पुढचा चेहरा कोण?
A brief introduction of the newly elected CM of Uttarakhand Tirath Singh Rawat