Uttarkashi Bus Accident : उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात, यमुनोत्रीला जाणारी बस दरीत कोसळली, मृतांचा आकडा 22वर

उत्तरकाशीमध्ये भीषण बस अपघात झालाय. उत्तरकाशीमध्ये डामटा ते नौगांवदरम्यान खड्ड जवळ एक प्रवासी बस 500 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Uttarkashi Bus Accident : उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात, यमुनोत्रीला जाणारी बस दरीत कोसळली, मृतांचा आकडा 22वर
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:39 PM

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये (UttarKashi) भीषण बस अपघात झालाय. उत्तरकाशीमध्ये डामटा ते नौगांवदरम्यान खड्ड जवळ एक प्रवासी बस 500 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बस अपघाताची (Bus Accident) माहिती मिळताच जिल्हा पंचायत सदस्य हाकम सिंह रावत यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलीस आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार बस यमुनोत्रीकडे (Yamunotri) जात होती. चालकाचा ताबा सुटल्यानंतर बस डामटा आणि नौगावमधील खड्ड जवळ एका दरीत कोसळली. बस जवळपास 500 मीटर खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळतेय. या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

अपघातग्रस्त बसमधील प्रवाशी मध्य प्रदेशातील

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील 28 यात्रेकरुंना घेऊन एक बस उत्तरकाशीला जात होती. ही बस डामटाजवळ दरीत कोसळली आहे. अनेक मृतदेह सापडले असून 6 जणांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे, अशी माहिती डीजीपी अशोक कुमार यांच्याकडून देण्यात आलीय.

अमित शाहांचा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींना फोन

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. जखमींना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफही लवकरच घटनास्थळावर पोहोचत आहे, अशी माहिती शाह यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.