Vande Bharat Sleeper coach : ‘आरामात’ करा वंदे भारतचा प्रवास, स्लीपर कोचसाठी किती आला खर्च

Vande Bharat Sleeper coach : वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर कोच लवकरच धावणार आहे. सेमी हायस्पीड वंदे भारतच्या स्लीपर व्हर्जनचे इंटेरिअर सध्या चर्चेत आले आहे. कारण ते आकर्षक आहे. तुम्हाला माहिती आहे का या स्लीपर वंदे भारतच्या एका ट्रेन सेटची किंमत आहे तरी किती?

Vande Bharat Sleeper coach : 'आरामात' करा वंदे भारतचा प्रवास, स्लीपर कोचसाठी किती आला खर्च
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 5:56 PM

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : वंदे भारतने देशाला जवळ आणले आहे. स्वतंत्र रेल्वे बजेट नसताना केंद्र सरकारने रेल्वे विकासाला चांगलेच बळ दिले आहे. झटपट प्रवासासाठी वंदे भारत सर्वात लोकप्रिय ट्रेन ठरली आहे. अनेक राज्यांनी या ट्रेनची मागणी केली होती. ही देशाची सेमी हायस्पीड ट्रेन (Semi High Speed Train) आहे. सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये केवळ बसून प्रवासाची व्यवस्था (Seating Arrangement) आहे. त्यामुळे प्रवाशांना एका मर्यादेबाहेर या ट्रेनमधून प्रवास करता येते नाही. नेमकी हीच समस्या ओळखून स्लीपर कोचची सुरुवात होत आहे. वंदे भारत स्लीपर कोच लवकरच देशाच्या रुळावरुन वेगे वेगे धावेल. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) या स्लीपर कोच तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या रेल्वेच्या बांधणीचे काम वेगाने सुरु आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यासाठी किती कोटी रुपयांचा खर्च आला आहे ते?

बैठ्या आसन व्यवस्थेपेक्षा जास्त खर्च

वंदे भारत एक्सप्रेसचा विकास भारतीय रेल्वेच्या मॅकेनिकल इंजिनिअर्संच्या टीमने केला आहे. 2018 मध्ये तिच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी 16 डब्ब्यांच्या एका ट्रेनसाठी जवळपास 115 कोटी रुपयांचा खर्च आला होता. पण कोरोनानंतर लोखंड आणि अन्य धातूंच्या किंमती वाढल्या. त्यामुळे एकूण खर्चात भर पडली. सध्या पण 115 कोटी रुपयांच्या घरातच खर्च येत आहे. पण स्लीपर वंदे भारतची किंमत बैठ्या आसन व्यवस्थेपेक्षा अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे स्लीपर वंदे भारतची किंमत

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची किंमत जास्त आहे. इंटेगरल कोच फॅक्टरीनुसार जवळपास 127 कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी रशियाच्या काइनेट रेल्वे सोल्युशन्सची (Kinet Railway Solutions) मदत घेण्यात येत आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या (Rail Vikas Nigam Limited (RVNL) सहकार्याने हे काम सुरु आहे. करारानुसार 120 कोटी रुपयांत एक सेट तयार करण्यात येणार होता. या किंमतीवर वंदे भारतचे 200 ट्रेन सेट तयार करण्यात येत आहे.

पुढील वर्षी या महिन्यात भेटीला

चेन्नई येथील द इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) वंदे भारत स्लीपरच्या डिझाईनचे काम सुरु असून डिसेंबर अखेरपर्यंत त्याला मूर्त रुप मिळेल. पुढील वर्षात मार्च 2024 मध्ये ही स्लीपर ट्रेन तयार होऊन कारखान्याबाहेर पडेल आणि त्यानंतर लागलीच अथवा एका महिन्यात प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येईल, अशी आशा आहे.

इतके कापणार अंतर

वंदे भारतचे तीन फॉर्मेट आहेत. 100 किलोमीटर पेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो, 100-550 किलोमीटरसाठी वंदे चेअर कार आणि 550 किलोमीटर पेक्षा पुढील प्रवासासाठी वंदे स्लीपर ट्रेन असेल. पुढील वर्षात फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान या ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.