Vande Bharat Train : केंद्र सरकारकडून 9 वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट! या राज्यांना होईल फायदा
Vande Bharat Train : देशातील नागरिकांना केंद्र सरकार वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल. 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या राज्यांना जोडण्यासाठी ही ट्रेन उपयोगी पडेल. या नवीन वंदे भारत रेल्वेबाबत लोकांमध्ये उत्साह दिसत आहे.
नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : देशात वंदे भारतने (Vande Bharat Train ) रेल्वेला गतिमान केले आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वंदे भारत रेल्वेवर प्रवाशी फिदा आहेत. अनेक राज्यांनी वंदे भारतची मागणी केली आहे. महाराष्ट्रातही वंदे भारत लोकप्रिय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 24 सप्टेंबर रोजी 9 नवीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. या ट्रेनमुळे प्रवाशांना पुरी, मदुराई आणि तिरुपतीला जलद पोहचता येईल. तसेच इतर ठिकाणी पण जलद पोहचता येईल. या नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. आरमदायक सीटसह इतर ही अनेक सुविधा देण्यात येतील. त्याचा प्रवाशांना फायदा होईल.
असा आहे कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे या नवीन 9 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन वंदे भारत रेल्वे देशभरात कनेक्टिविटी वाढविण्यासाठी उपयोगी पडतील. रेल्वे प्रवाशांना अद्ययावत आणि आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न या रेल्वेच्या माध्यमातून होत आहे.
कोणत्या आहेत या 9 नवीन वंदे भारत एक्सप्रेस
- उदयपुर-जयपुर वंदे भारत एक्सप्रेस
- तिरुनेलवेली-मदुराय-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
- हैदराबाद-बेंगळुरु वंदे भारत एक्सप्रेस
- विजयवाडा – चेन्नई (रेनिगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस
- पटना-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
- कासरगोड-तिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
- राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस
- रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
- जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
या राज्यांना होणार फायदा
या नऊ वंदे भारत ट्रेन 11 राज्यातून जातील. यामध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात राज्यांना जोडण्याचे काम होईल. ही रेल्वे त्यांच्या मार्गावरील वेगवान ट्रेन असेल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. त्यांना गंतव्य स्थानी पटकन पोहचता येईल.
वंदे मेट्रोला पण मुहूर्त
वंदे मेट्रोला पण मुहूर्त लागणार आहे. 12 कोचची ही ट्रेन छोट्या रुटवर चालविण्यात येईल. पहिली वंदे मेट्रो ट्रेन जानेवारी, 2024 मध्ये येण्याची शक्यता आहे. पण ही ट्रेन या वर्षाअखेरीस तयारी होण्याची शक्यता आहे. नॉन-एअर कंडीशन प्रवाशांसाठी ही रेल्वे 31 ऑक्टोबरपर्यंत येईल, अशी शक्यता आहे. यामध्ये 22 कोच आणि दोन्ही बाजूने एक एक लोकोमोटिव्ह असेल.