वंदे भारतप्रमाणे आता वंदे मेट्रे, किती असणार भाडे, मुंबई-पुणे कधी सुरु होणार?

देशातील नागरिकांनी वंदे भारत एक्स्प्रेसला चांगलीच पसंती दिली. आता वंदे भारत प्रमाणे वंदे मेट्रो सुरु होणार आहे. वंदे मेट्रो दोन मोठी शहरे एकमेकांशी जोडणार आहे. वंदे मेट्रो 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांना जोडले जाणार आहे.

वंदे भारतप्रमाणे आता वंदे मेट्रे, किती असणार भाडे, मुंबई-पुणे कधी सुरु होणार?
new vande metroImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 8:02 AM

नवी दिल्ली : देशात वंदे भारत एक्स्प्रेसला चांगले यश मिळाले. त्यानंतर आता नवीन प्रकल्पावर काम सुरु झाले आहे. वंदे भारत ट्रेननंतर आता सरकार लवकरच वंदे मेट्रो सुरू करणार आहे. येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत वंदे मेट्रो रुळावर येण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. देशात सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस १४ ठिकाणी सुरु आहे. आता सरकार वंदे मेट्रो आणत आहे. वंदे मेट्रो मोठी शहरे एकमेकांशी जोडणार आहे. वंदे मेट्रो 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांना जोडणार आहे. यामुळे लोकल गाड्यांवरील गर्दी कमी होईल, असे वैष्णव यांनी सांगितले.

किती असणार भाडे

वंदे मेट्रोचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे असणार आहे. वंदे भारतला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाड्या तयार करण्यात येत असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ‘हाय-स्पीड टेस्ट ट्रॅक’च्या मुद्द्यावर, वैष्णव म्हणाले की या ट्रॅकचा उद्देश हाय-स्पीड ट्रेन्सची चाचणी सुलभ करणे आहे आणि अशा ट्रेन्सच्या उत्पादनास गती देणे आहे.

काय आहे वंदे मेट्रोची वैशिष्ट्ये

  • वंदे मेट्रो 100 किमीपेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांमध्ये धावणार आहे.
  • वंदे मेट्रो ही वंदे भारत एक्सप्रेसची कमी अंतराची आवृत्ती आहे.
  • वंदे मेट्रो एका मार्गावर दिवसातून 4 ते 5 वेळा धावतील.
  • वंदे मेट्रोमुळे ट्रेन प्रवाशांना जलद शटलसारखा अनुभव देईल.
  • वंदे मेट्रो ट्रेनला आठ डबे असतील. सामान्य वंदे भारत ट्रेनमध्ये १६ डबे असतात.
  • नियमित एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या नागरिका आणि विद्यार्थी यांना कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ जाता येईल.

जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि लखनऊमधील रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन  यांना आठ डब्यांच्या वंदे भारत ट्रेनसाठी रेकचे उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

कधी धावणार

वंदे मेट्रो ही स्वदेशी ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत रुळावर धावण्यास सुरुवात होईल. वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन मे-जूनपर्यंत समोर येईल. ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी क्रांतिकारी बदल ठरेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले. वंदे मेट्रो ट्रेन 1950 आणि 1960 च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेईल. मुंबई-पुणे दरम्यानही ही ट्रेन सुरु होणार आहे.

कशी असणार ट्रेन

वंदे मेट्रोमध्ये इंटरसिटी गाड्यांप्रमाणे फक्त आठ ते दहा डबे असतील. वंदे मेट्रो ट्रेनचा वेग 120 ते 130 असेल. जवळच्या स्थानकांमधून ते थोड्याच वेळात शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. मेट्रोप्रमाणेच यात स्वयंचलित दरवाजे, एलईडी स्क्रीन असतील.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.