जरा धीर धरा, मोदी युगानंतर BJPमध्ये फूट पडेल; Veerappa Moily यांचा G-23 नेत्यांना सल्ला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी जी-23च्या नेत्यांना एकसंघ राहण्याचं आवाहन केलं आहे. सध्या भाजप ज्या स्थितीत आहे. त्याच स्थितीत ते कायम राहणार नाहीत. मोदी युगानंतर भाजपमध्ये फूट पडणारच आहे.
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली (veerappa moily) यांनी जी-23च्या नेत्यांना एकसंघ राहण्याचं आवाहन केलं आहे. सध्या भाजप (BJP) ज्या स्थितीत आहे. त्याच स्थितीत ते कायम राहणार नाहीत. मोदी (narendra modi) युगानंतर भाजपमध्ये फूट पडणारच आहे. त्यामुळे एकजूट राहा, असं आवाहन विरप्पा मोईली यांनी केलं आहे. आपण सत्तेत नाहीत म्हणून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जावू नये. भाजप आणि इतर पक्ष येतील आणि जातील. काँग्रेस आहे त्याच ठिकाणी आहे. आपण आशा सोडता कामा नये, असं सांगतानाच आपण दलितांसाठी संघर्ष केला पाहिजे, असं आवाहन मोईली यांनी केलं. पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसमधील जी-23 नेत्यांच्या गटाने डोकं वर काढलं आहे. या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावरच हल्लाबोल सुरू केला आहे. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तर गांधी कुटुंबाने पक्षाचं नेतृत्व सोडण्याची मागणीच केली आहे. त्यामुळे विरप्पा मोईली यांच्या या विधानाला महत्त्व आलं आहे.
सोनिया गांधी यांना पक्षांतर्गत सुधारणा हव्या आहेत. मात्र त्यांच्या आजूबाजूचे लोक ते होऊ देत नाही. जी-23चे नेते पक्ष नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यामुळे पक्ष अजून कमकुवत होत आहे, अशी खंतही विरप्पा मोईली यांनी बोलून दाखवली. भाजप नेहमीच याच स्थितीत राहणार नाही. नरेंद्र मोदी यांचं राजकारण संपुष्टात आल्यानंतर भाजपमध्येही फूट पडेल, असंही त्यांनी सांगितलं.
मंत्रिपद घेताना लोकशाही प्रक्रिया का आठवली नाही?
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही जी-23 नेत्यांवर हल्ला चढवला. यूपीएच्या सरकारमध्ये या राजकारण्यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. तेव्हा लोकशाही प्रक्रियेद्वाराच मंत्रिपद दिलं पाहिजे, असं या नेत्यांनी का म्हटलं नाही? तेव्हा आपण सत्तेत होतो. त्यामुळे नेतृत्व सांगेल तसेच करत होतो. राजकीय पक्षांमध्ये चढउतार येत असतात. याचा अर्थ असा नाही की बंड केलं पाहिजे, असा हल्लाही चौधरी यांनी चढवला.
जी-23 नेते सक्रिय
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसमधील जी-23 गट सक्रिय झाला आहे. या गटाच्या नेत्यांनी थेट गांधी कुटुंबावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. या जी-23 नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका होत असून त्यामुळे काँग्रेसवर दबाव वाढवला जात आहे. या गटात कपिल सिब्बल यांच्यापासून गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही आहेत.
संबंधित बातम्या:
Bhagwant Mann Cabinet : भगवंत मान यांच्या टीमचा उद्या शपथविधी सोहळा, 11 जणांना मंत्रिपदाची संधी
2022 मधील पहिलं चक्रीवादळ Asani बंगालच्या उपसागरात तयार होणार? आर्मीसह यंत्रणा अलर्टवर
West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये तस्करांच्या मनसुब्यावर पाणी, 40 सोन्याची बिस्कीटं जप्त