AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ, टेबलावर चढले खासदार, गोंधळ पाहून व्यंकय्या नायडू भावूक

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) मंगळवारी (१० ऑगस्ट) राज्यसभेत  (Rajya Sabha) भावून झाल्याचे पहायला मिळालं. मंगळवारी राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी (Opposition MPs) अभूतपूर्व गोंधळ घातला. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडू नाराज झाले. त्यांनी विरोधी खासदारांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. सदस्यांचं हे राज्यसभा असभ्य वर्तन पाहून व्यंकय्या नायडू भावूक […]

विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ, टेबलावर चढले खासदार, गोंधळ पाहून व्यंकय्या नायडू भावूक
राज्यसभा
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 2:26 PM

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) मंगळवारी (१० ऑगस्ट) राज्यसभेत  (Rajya Sabha) भावून झाल्याचे पहायला मिळालं. मंगळवारी राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी (Opposition MPs) अभूतपूर्व गोंधळ घातला. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडू नाराज झाले. त्यांनी विरोधी खासदारांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. सदस्यांचं हे राज्यसभा असभ्य वर्तन पाहून व्यंकय्या नायडू भावूक झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपसभापती व्यंकय्या नायडू काही खासदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. (Venkaiah Naidu gets emotional while trying to persuade Rajya Sabha MP’s)

‘सभागृहाचा सातत्याने अवमान होत आहे’

संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliamentary Monsoon Session) सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळाचं सत्र कायम ठेवलं. पेगासस आणि इतर मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरत खासदारांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे अनेकदा सभागृह तहकूब करावी लागली. त्यावर नाराज होत व्यंकय्या नायडू म्हणाले, ”पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून सभागृहाचा अवमान होत आहे, याचे मला खूप वाईट वाटते. असे वाटते जसे काही सभागृहात काही वर्गांमध्ये स्पर्धा सुरू आहे. आपल्या मंदिरांमध्ये, भक्तांना गर्भगृहात काही मर्यादेपर्यंत प्रवेश करण्याची परवानगी आहे. कुणी त्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. सभागृहाच्या गर्भगृहात अशाप्रकारे प्रवेश करणे म्हणजे एकप्रकारे त्याला अपवित्र करणं आहे आणि हे वर्षानुवर्षे घडत आले आहे.”

टेबलवर चढले राज्यसभा सदस्य

मंगळवारी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. यावेळी काही खासदार राज्यसभेतल्या अधिकारी आणि पत्रकारांची आसनव्यवस्था असते त्या टेबलवर चढल्याचं पहायला मिळालं. एका खासदाराने तर शासकीय कागदपत्र सभापतींच्या आसनाकडेही भिरकावली. खासदारांच्या या कृतीनंतर नायडू यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण खासदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

स्वतःला आक्रमक दाखवण्याची स्पर्धा कारणीभूत

यासोबतत काही खासदारांनी सभागृहात सुरू असलेला गोंधळ मोबाईलवर शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यातून जनतेला सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग केली जाते हे समजलं असेल. काही सदस्यांनी स्वतःला आक्रमक दाखवण्याची स्पर्धा याला कारणीभूत असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

अमित शाह, पियूष गोयलांची घेतली भेट

सभागृहातल्या गोंधळावर नाराज झालेल्या उपसभापती व्यंकय्या नायडू यांनी गृहमंत्री अमित शाह आणि सभागृह नेता पीयूष गोयल यांची भेट घेतली. याशिवाय भाजपच्या काही खासदारांचीही नायडू यांनी भेट घेतली. त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

संसदेने कायदा करुनही 50 टक्क्यांच्यावरती आरक्षण देता येणार नाही, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी टेक्निकल मुद्दा सांगितला!

पाटील, फडणवीसांनंतर आता राज्यपाल कोश्यारीही दिल्लीत; मोदी, शहांना भेटणार?

सरकार 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार, पटापट पीएफ तपासा

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....