Vice Presidential Election : जगदीप धनखड-मार्गारेट अल्वा यांच्यात काटें की टक्कर!, आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी

Vice Presidential Election : जगदीप धनखड-मार्गारेट अल्वा यांच्यात काटें की टक्कर!, आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 9:35 AM

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक (Vice Presidential Election) होत आहे. आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एनडीएकडून जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्यात लढत होईल. या निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर बहुजन समाज पार्टीने एनडीएला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे. आजच उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून आजच दिवशी मतमोजणी होणार आहे. म्हणजे देशाला आजच नवा उपराष्ट्रपती मिळणार असल्याने जगदीप धनखड उपराष्ट्रपती होणार की मार्गारेट अल्वा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करणार आहेत. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मलाच मतदान करण्याचं आवाहन खासदारांना केलं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप नसणार आहे. भीती न बाळगता तुम्ही मतदान करा. उपराष्ट्रपती हा देशासाठी काम करणारा, निष्पक्ष असावा यासाठी मला मतदान करा, असं आवाहन मार्गारेट अल्वा यांनी केलं आहे.

दोघेही माजी राज्यपाल

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही नेत्यांचा राजकीय ग्राफ जवळजवळ सारखा आहे. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाल होत्या. दोघेही माजी मंत्री आहेत. दोघेही पेशाने वकील आहेत. त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ नेत्यांपैकी कोण उपराष्ट्रपती होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

हे सुद्धा वाचा

बसपा एनडीए सोबतच

मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही बसपाने एनडीएला पाठिंबा दिला होता.

शिवसेनेची पलटी

दरम्यान, शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पलटी मारली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत यूपीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आधी यूपीएला पाठिंबा दिला होता. मात्र, खासदारांच्या दबावापोटी शिवसेनेने एनडीएला पाठिंबा दिला होता. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भूमिका बदलली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.